Skip to main content

Posts

Showing posts from 2017

समुद्र किनारा

(सदर कथा संपूर्ण पणे काल्पनिक आहे त्याचा वास्तविक घटना आणि नावांशी काही एक संबंध नाही .तस असेल तर तो निव्वळ योगायोग असू शकेल)         हरिहरेश्वर माझा आवडत गाव .. गेले काही वर्ष मी इथ  जवळच राहतो .सावित्री नदी जिथं समुद्राला मिळती  तिथे हे गाव वसला आहे . भगवान शंकराच मंदिर ,मंदिराच्या मागच्या बाजूंला प्रदिक्षणा मार्ग तिकडे जाणारा पायऱ्यांचा य रस्ता आजूबाजूला चार टेकड्या या मध्ये वसलेला हे गाव . मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा,  तिथून बीच वर चालत गेला कि लांब वर मी राहतो.तिथेच काही जण  अजून राहतात . सहसा मी मंदिरा कडे  जात नाही . मागे मात्र जातो तिथे खूप खोल घळयी आहेत लोक तिथे येतात फोटो काढतात .मस्ती करतात .काही जण तिथ बुडून मेलेत .समुद्र खोल आहे .कळत नाही किती खोल आहे .           माझी ओळख करायची  राहिली कि !,माझा नाव हरी !!  उस्मानाबाद मध्ये मध्ये कॉलेज ला होतो .आमच्या गाव कडे समुद्र नाही त्या मुळे मला समुद्राची खूप ओढ होती  ,समुद्रावर याव, मस्त ...

ताम्हिणी ८ कि.मी

      " चला शेवटी शनिवार आला एकदाचा , आता रविवारची उद्या सुट्टी !!"ऑफिस मध्ये कामाला सुरुवात करताना सकाळी त्याच्या मनात विचार आला आणि मनातल्या मनातच तो खुश झाला.गेले काही दिवस कामाचा ताण इतका होता की त्यामुळे कंटाळून गेला होता.मनातले विचार बाजूला करून म्हणला चला रोहन राव! आधी काम संपवा आणि मग सुट्टी चा नियोजन करा ."असं विचार करत तो आपल्या कामात गढून गेला .       दुपारी लंच ब्रेक मध्ये रोहन ने whatsup वरून आपल्या   जिवलग मित्र केदार ला मेसेज केला "उद्या आपण फॅमिली सहित सकाळीतुझ्या गाडी ने औटिंग ला   जाऊ , कुठे ते   संध्याकळी सांगतो , मस्त पावसाळा सुरू झाला आहे छान आपल्या पोरांना ही चेंज होईल , मेसेज बघून रिप्लाय दे " मेसेज सेंड करून तो कुठे जावे या साठी "स्थळ संशोधन "करू लागला .मोबाईल मध्ये सर्च करताना एक ठिकाण आवडलं "ताम्हिणी घाट " मागच्या वर्षीच सोलापूरतून   पुण्यात   स्थायिक झालेला असल्याने या परिसराची अजून त्याला जास्त माहिती न्हवती म्हणून आजून काय माहिती मिळते ते तो बघत होता .केदार तसं येऊन पाच वर्षे झाली होती पण त्याल...