Skip to main content

Posts

Showing posts from 2014

आठरे-पाटील

मला भावलेली माणसे : ****आठरे-पाटील( नाना) *** २००५ सालच्या दरम्यानची गोष्टआहे.मी पुण्यातून दुध डेअरी ची रिपेअरिंग ची काम करत असताना छोटी मोठी प्रोजेक्ट घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि मला नगर जिल्ह्यातलं एक गावामध्ये एक एजन्सी कडून जुनी मशीन्स १नवीन दुध डेअरी मध्ये बसवण्याच काम मिळाल होतं.मला सांगण्यात आल होतं कि तिथ जाऊन "आठरे –पाटील (नाना)" ना भेटा. ठरल्याप्रमाणे मी त्या अडनिड गावी (आता न ाव आठवत नाही गावाचं!) गेलो.आतापर्यंत ३ वर्ष झाले होते मी व्यवसाय सुरु करून आणि महाराष्ट्रातील बऱ्याच दुध डेअरी ना काम निमित्ताने जाण्याचा योग आला होता.त्या मुळे डेअरी चा चेअरमन कसा असतो हे चांगलाच माहित झालं होता. कुठल्या ना कुठल्या पक्षाची पार्श्वभूमी असलेल्या व पांढरे खादीचे कपडे,ती नवीन घेतलेली स्कर्पिओ किवा तत्सम गाडी, आणि बाकीचा लवाजमा, ऑफिस च्या बाहेर ताटकळत बसलेले कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने बसलेले लोक हे मी आत्ता पर्यंत पाहिलेले वास्तव होते.( अर्थात काही सन्माननीय अपवाद होते पण परिस्थिती साधारण सारखीच होती सगळी कडे) तोच दृष्टीकोन घेऊन मी ती डेअरी शोधत पोहचलो. अर्धवट बांधकाम चालू ...

A man with only hand

A man with only hand  आज रात्री माझ्या वर्कशॉप वर night शिफ्ट चालू असल्यामुळे मी पण थांबून माझा काही काम करत बसलो. laptop वर संदीप माहेश्वरींच्या स्पीच ची एक क्लीप लाऊन ठेवली होती, ती ऐकाताना त्यातील एक कथा फार आवडली म्हणून ती शेअर करतो आ हे. हि कथा आहे क्यारली नावाच्या हंगेरियन सैन्यामधल्या एक पिस्टल शुटर ची. त्याने पिस्टल शुटींग मध्ये मोठ नाव केलेलंआणि राष्ट्रीय स्तरावरच्या बऱ्याच स्पर्धा जिंकल्या होत्या. १९३८च्या एका ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्याच्या उजव्या हातामध्ये ह्यांडग्रेनेड चा स्फोट होऊन तो हात कायमचा वापरण्यास अयोग्य झाला, ज्या हाताने तो पिस्तुल शुटींग मध्ये बक्षीस मिळवायचा तो हातच निकामी झाल्यावर एखाद्याने खरा तर त्या क्षेत्रातल करिअर संपवल असत .लोकांना हि असच वाटलंपण त्याने काय नाही त्या पेक्षा काय आहे या कडे लक्ष दिलं आणि दवाखान्यातून बाहेर पडल्यावर त्याने डाव्या हाताने पिस्तुल शुटींग ची प्रक्टिस सुरु केली . १ वर्षाच्या प्रचंड प्रक्टिस नंतर तो १९३९च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने त्याच्या डाव्या हाताने प्रथम पारितोषिक पटकावले, आणि लोकांना तोंडात बोट घालायला लावले, त्य...

नशीब

काही दिवसापूर्वी "संतोष" गाठ पडला होता.फार थकल्यासारखा दिसत होता.त्याला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विचारलं आता गाणं म्हणतोस का रे ?  हसला आणि म्हणाला कसला अरे!! आता नोकरीच्या ,संसाराच्या सगळ्या जबाबदरीत गेला सगळं नाद !! पुण्यात मी आल्यावर कर्वे नगरला पहिली रूम केली केली तेव्हा तो रूममेट होता,सगळे बारामतीचे आणि मी एकटा बाहेरचा ,पंढरपूरचा पण गेलो मिसळून त्यांच्यामध्ये लगेच !! संतोष बऱ्याच  मुलांसारखा स्ट्रगलर, त्याला गायक व्हायचं होतं .छांन होता आवाज त्याचा,कायम रूम मध्ये किशोरची गाणी टेपवर चालू असायची आणि त्या गाण्यांच्या साथीला याचा आवाज एकत्र ! याच्याशी गाण्याबद्दल कोणाच बोलत नसायचं पण मला आवडलं होता त्याचं गाणं म्हणून मी त्याचं कौतुक केला होता .झाल !! साहेब दररोज मला एक गाणं पूर्ण म्हणून दाखवायचे ! त्यावेळेस स्तूदिओ मध्ये म्हणे आयत्या सौंडत्र्यक वर गाणी म्हणयचा नवीन प्रकार आला होता.हौशी गायक त्यावर रेकोर्डिंग करून घ्यायचे ! संतोषने हि अशी बरीच गाणे करून घेताले होते आणि तीच गाणी तो टेप वर लावी.नंतर नंतर मलाच याचा भयंकर कंटाळा येऊ लागला होता .पण याचा आत्मविश्वास प्रच...