Skip to main content

Posts

Showing posts from 2019

झोका

************************************************************************************************************** सुनिता: “आज जरा मला अस्वस्थ वाटत आहे.थोडी चुटपूट ,घाबरल्या सारखा वाटत आहे .काही तरी बिनसल्या सारखा वाटत आहे.या बंगल्यात खाली कोणी तरी रहायला येईल अस दिसतंय.आज घरमालक कुणाला तरी घर दाखवयाला आला होता वरच्या मजल्यावर काही आला नाहीकुणाला तरी खालची बाजू दाखवून खालच्या खाली निघून गेला. आम्ही भाड देत नसलो म्हणून काय झाल ?आमच्या परवानगी शिवाय कुणाला भाड्याने अस कस देऊ शकतो ? ,बघायला पाहिजे त्याच्या कडे !! मी तर चांगली कजाग आहे पण माझा नवरा “अजिंक्य” त्याला तर हल्ली जाम घाबरतो आमचा घर मालक !! हा हा हा !! मला प्रसंग आठवून सुद्धा हसू येतय !! अहो मी कोण हे सांगितलाच नाही मी सुनिता!! मी, माझा नवरा अजिंक्य आणि आमचा छोटा मुलगा नयन असे आम्ही तिघे राहतो या घरात!! जरा आडबाजूला आहे हा बंगला पण आम्हाला चालतो! इतकी वर्ष झाले राहतोय कसली म्हणून काळजी नाही वाटत इकडे ! अस हि बाप लेक दिवसभर नसतात रात्री येतात !माझ्या लेकराला खाली झाडाजवळ च्या झोपाळ्यावर खेळायला खूप आवडत!आधी पडेल का काय? हि भ...

आत्म्यांचा मॉल

        सगळं आकाश ढगांनी व्यापून गेल होत, एव्हानारात्र झाली होती तो झप झप पावल टाकत रस्त्यावरून निघाला “कधी पण पाऊस सुरु होईल आता आडोसा शोधला पाहिजे,शहरात येऊन आज तिसरा दिवस आहे अजून राहायची सोय नाही झाली पोटाची तर  आबाळच  आहे वडापाव वर किती दिवस काढणार ?खिशात मोजून दीड दोनशे रुपये राहिलेत. आता रात्री STबस स्टोप वर पोलीस झोपू देत नाहीत. काल रात्री तर कपड्याची ब्याग चोरीला गेली आणि पोलिसाने काठी मारून उठवून हाकलून दिले ते वेगळ , एवढ मोठ शहर पण अजून आपल्या ओळखीच कोणी भेटलं नाही ,एक परीने बराच आहे म्हणा नवीन सुरुवात करायाची आहे आयुष्याची, सगळ्या नवीन ओळखी असाव्यात जुनी ओळख नकोच !”       ‘’कड्डाड” करून वीज कोसळली आणि जोराचा पाऊस सुरु झाला.धो धो पावसात त्याने इकडे तिकडे बघितले .आपण नक्की कुठे आहोत हेच त्याला काळात न्हवते .येव्हडे मोठे शहर ,भटकत कुठ आलो काय माहित?आपल्याला काय सगळं सारखाच !स्वतःशीच त्याने हसत विचार केला “चला अनिलराव ,आडोसा शोधा! भिजला आहात तुम्ही!” वीजाच्या प्रकशात समोर बघितला तर एक बांधकाम अर्धवट राहिलेली खूप मोठी इमारत होती आत ...

फुगा

             “साहेब, ह्यो फुगा कितीला मिळतो हो हित?” त्याने न राहून आज प्रश्न विचारलाच ! साहेब गाडी काढत म्हणाले “अहो याचा चार्ज लावत नाहीत गिफ्ट असतो !” तसाहेबाच्या मुलीने विचारल “का हो काका तुम्हाला घ्याचायचं का?   कसनुस हसत त्याने नाही म्हणून नेहमी सारखा साहेबाना गाडी रिवर्स घ्यायला मदत केली साहेब निघाले विचार करत परत   थाबुन त्याला विचारलं “duty किती ला संपते तुमची?” त्याने सांगितला ”१० वाजता ” साहेब “बर”एवढाच म्हणाले आणि निघून गेले . आज रविवार असल्यामुळं गर्दी ची वेळ त्या मुळ तो परत   येणारे लोक आपल्या गाड्या निट पार्क करत आहेत का हे बघत असताना सहा महिन्यातला आयुष्याचा पटल त्याच्यासमोर तरळला .                               एक महिना होत आला होता त्याला इथ duty ला लागून !! गावाकडे दुष्काळामुळे शेतीत काय करता येत न्हवत आणि शिक्षण १२ वी झाली होती काही तरी जगायला काम केला पाहिजे   म्हणूनं मग तो पुण्यात आला .गावातलाच एक माणूस इथल्या सिकुरीटी कंपनीत...