Skip to main content

समुद्र किनारा

(सदर कथा संपूर्ण पणे काल्पनिक आहे त्याचा वास्तविक घटना आणि नावांशी काही एक संबंध नाही .तस असेल तर तो निव्वळ योगायोग असू शकेल)
        हरिहरेश्वर माझा आवडत गाव .. गेले काही वर्ष मी इथ  जवळच राहतो .सावित्री नदी जिथं समुद्राला मिळती  तिथे हे गाव वसला आहे . भगवान शंकराच मंदिर ,मंदिराच्या मागच्या बाजूंला प्रदिक्षणा मार्ग तिकडे जाणारा पायऱ्यांचा य रस्ता आजूबाजूला चार टेकड्या या मध्ये वसलेला हे गाव . मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा,  तिथून बीच वर चालत गेला कि लांब वर मी राहतो.तिथेच काही जण  अजून राहतात . सहसा मी मंदिरा कडे  जात नाही . मागे मात्र जातो तिथे खूप खोल घळयी आहेत लोक तिथे येतात फोटो काढतात .मस्ती करतात .काही जण तिथ बुडून मेलेत .समुद्र खोल आहे .कळत नाही किती खोल आहे .
          माझी ओळख करायची  राहिली कि !,माझा नाव हरी !!  उस्मानाबाद मध्ये मध्ये कॉलेज ला होतो .आमच्या गाव कडे समुद्र नाही त्या मुळे मला समुद्राची खूप ओढ होती  ,समुद्रावर याव, मस्त गाणी ऐकत सूर्यास्त बघत बसायचे अशी  माझी आवड होती .कॉलेज ला यायच्या आधी मी लहानपणी शाळेच्या ट्रीप ला इथ येउन गेलो होतो .परत आलो ते कॉलेज च्या ट्रीप ला.आता इथेच राहतोय .एखाद्या जागेशी अशी काही गट्टी जमती कि ती जागा सोडावीशी वाटत नाही .इच्छा असून हि.... !
         मला रात्री बीच वर फिरयला खूप आवडता.भीती नाही वाटत कसलीच , शांत समुद्र ,फेसाळत्या लाटा त्यांचे आवाज  मला शांत शांत करतात .खवळलेला समुद्र बघुन मला भीती वाटते तेव्हा मंदिरा कडे जायचा नसत!! दिवसा मी बीच वर येत नाही खूप गर्दी असते मला गर्दी आवडत नाही.
         आज कसला तरी आनंद वाटत होता कसला ते कळात न्हवत ,रात्री बीच वर फिरत होतो काही तरी चाहूल लागली.लांब वर काही लोक तिथ दारू पीत धिंगाणा घालत होते .किती वाजले कळत न्हवता कारण आता मी घड्याळ वापरत नाही .मला ओळखीची चाहूल लागली म्हणून मी जवळ गेलो काही जण दारू पिऊन समुद्रात उतरले होते त्यात किरण पण होता माझा कॉलेज चा मित्र !! बाकीचे त्याला ‘किरण्या तिकडे पाण्यात जाऊ नको,मागच इसरला काय ? अस सांगत होते .तरी तो आपल्याच मस्तीत  त्या खडक असलेल्या ठिकाणी  चालला होता तिथ समुद्र खोल होत जातो .
        किरण चे दोन्ही मित्र तिथून हलले नाहीत त्यांना जास्त झाली होती आपसात ते बोलत होते त्यातला एक जण म्हणत होता “आमची कॉलेज ची ट्रीप आली होती सगळे पोर पोर ठरवून ट्रीप काढली होती . आम्ही गाडी करून आलो होतो .किरण त्यात आगाव पोरग!! संध्याकाळी आम्ही सगळे  दारू पिऊन इथच  कुठ तरी बसलो होतो इथ खर तर दारू प्याला परवानगी नाही पण आम्ही  लपवून आणली होती.नाव आठवत नाही  आमच्यातला एक पोरगा इथ वाकमन वर गाणी ऐकत बसला होता. मागून कधी किरण्या आला आणि त्याचा  वाकमन हिसकावून घेतला.वाकमन  घेऊन  तो पुढे ते पोरगा मागे  मागे असा पळत होते .दोघा हि खोल समुद्रात शिरले”.
        एकदम लोक ओरडायला लागले म्हणून हे  कॉलेज ची स्टोरी सांगणारी पोर पळत तिकडे गेली.आता जाड झालेली पोर आणि त्यात दारू पिलेली नित पळता पण येत न्हवता. किरण्या बुडला होता त्याचा थांग पत्ता  लागत न्हवता.काही वेळाने पोलीस पण आले होते .रात्र भर बोटीने तपास करून अजून त्याची बॉडी पण सापडली न्हवती.सापडणार हि न्हवती मी म्हणला न समुद्र खोल आहे तिकड  !!
    मघाच्या पोरांची दारू उतरली होती पोलीस विचारत होते आणि ते सांगत हते “ साहेब ! मी म्हणत होतो इकडे नको यायला. काही वर्षांपूर्वीआमच्या कालेज ट्रीप मध्ये असच एक पोरग इथ गायब झाला होत. त्याला वाकमन च्या पायात दारू च्या नशेत किरण ने ढकलून दिल होत .त्याची बॉडी पण शेवट पर्यंत मिळाली नाही.!! आठवल हरी त्याच नाव   .!!”
       मी  तोवर माझा बदला पूर्ण केला होता किरण्या पाण्यात गेल्यावर त्याला मी त्याच जागेवर घेऊन गेलो आणि तसाच पाण्यात खोल खोल नेला .त्याची पण बॉडी आता मिळणार नाही!!!आता इथून मी जाऊ शकतो .इतके वर्ष अडकलेला माझा जीव आता मोकळा झाला .काही वेळाने  उजाडेल .मी कायमचा जातोय इथून, किरणला  इथ ठेवून  !!!
(समाप्त)
©श्रीपाद भिवराव

Comments

Popular posts from this blog

आठरे-पाटील

मला भावलेली माणसे : ****आठरे-पाटील( नाना) *** २००५ सालच्या दरम्यानची गोष्टआहे.मी पुण्यातून दुध डेअरी ची रिपेअरिंग ची काम करत असताना छोटी मोठी प्रोजेक्ट घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि मला नगर जिल्ह्यातलं एक गावामध्ये एक एजन्सी कडून जुनी मशीन्स १नवीन दुध डेअरी मध्ये बसवण्याच काम मिळाल होतं.मला सांगण्यात आल होतं कि तिथ जाऊन "आठरे –पाटील (नाना)" ना भेटा. ठरल्याप्रमाणे मी त्या अडनिड गावी (आता न ाव आठवत नाही गावाचं!) गेलो.आतापर्यंत ३ वर्ष झाले होते मी व्यवसाय सुरु करून आणि महाराष्ट्रातील बऱ्याच दुध डेअरी ना काम निमित्ताने जाण्याचा योग आला होता.त्या मुळे डेअरी चा चेअरमन कसा असतो हे चांगलाच माहित झालं होता. कुठल्या ना कुठल्या पक्षाची पार्श्वभूमी असलेल्या व पांढरे खादीचे कपडे,ती नवीन घेतलेली स्कर्पिओ किवा तत्सम गाडी, आणि बाकीचा लवाजमा, ऑफिस च्या बाहेर ताटकळत बसलेले कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने बसलेले लोक हे मी आत्ता पर्यंत पाहिलेले वास्तव होते.( अर्थात काही सन्माननीय अपवाद होते पण परिस्थिती साधारण सारखीच होती सगळी कडे) तोच दृष्टीकोन घेऊन मी ती डेअरी शोधत पोहचलो. अर्धवट बांधकाम चालू ...

A man with only hand

A man with only hand  आज रात्री माझ्या वर्कशॉप वर night शिफ्ट चालू असल्यामुळे मी पण थांबून माझा काही काम करत बसलो. laptop वर संदीप माहेश्वरींच्या स्पीच ची एक क्लीप लाऊन ठेवली होती, ती ऐकाताना त्यातील एक कथा फार आवडली म्हणून ती शेअर करतो आ हे. हि कथा आहे क्यारली नावाच्या हंगेरियन सैन्यामधल्या एक पिस्टल शुटर ची. त्याने पिस्टल शुटींग मध्ये मोठ नाव केलेलंआणि राष्ट्रीय स्तरावरच्या बऱ्याच स्पर्धा जिंकल्या होत्या. १९३८च्या एका ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्याच्या उजव्या हातामध्ये ह्यांडग्रेनेड चा स्फोट होऊन तो हात कायमचा वापरण्यास अयोग्य झाला, ज्या हाताने तो पिस्तुल शुटींग मध्ये बक्षीस मिळवायचा तो हातच निकामी झाल्यावर एखाद्याने खरा तर त्या क्षेत्रातल करिअर संपवल असत .लोकांना हि असच वाटलंपण त्याने काय नाही त्या पेक्षा काय आहे या कडे लक्ष दिलं आणि दवाखान्यातून बाहेर पडल्यावर त्याने डाव्या हाताने पिस्तुल शुटींग ची प्रक्टिस सुरु केली . १ वर्षाच्या प्रचंड प्रक्टिस नंतर तो १९३९च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने त्याच्या डाव्या हाताने प्रथम पारितोषिक पटकावले, आणि लोकांना तोंडात बोट घालायला लावले, त्य...

फुगा

             “साहेब, ह्यो फुगा कितीला मिळतो हो हित?” त्याने न राहून आज प्रश्न विचारलाच ! साहेब गाडी काढत म्हणाले “अहो याचा चार्ज लावत नाहीत गिफ्ट असतो !” तसाहेबाच्या मुलीने विचारल “का हो काका तुम्हाला घ्याचायचं का?   कसनुस हसत त्याने नाही म्हणून नेहमी सारखा साहेबाना गाडी रिवर्स घ्यायला मदत केली साहेब निघाले विचार करत परत   थाबुन त्याला विचारलं “duty किती ला संपते तुमची?” त्याने सांगितला ”१० वाजता ” साहेब “बर”एवढाच म्हणाले आणि निघून गेले . आज रविवार असल्यामुळं गर्दी ची वेळ त्या मुळ तो परत   येणारे लोक आपल्या गाड्या निट पार्क करत आहेत का हे बघत असताना सहा महिन्यातला आयुष्याचा पटल त्याच्यासमोर तरळला .                               एक महिना होत आला होता त्याला इथ duty ला लागून !! गावाकडे दुष्काळामुळे शेतीत काय करता येत न्हवत आणि शिक्षण १२ वी झाली होती काही तरी जगायला काम केला पाहिजे   म्हणूनं मग तो पुण्यात आला .गावातलाच एक माणूस इथल्या सिकुरीटी कंपनीत...