(सदर कथा संपूर्ण पणे काल्पनिक आहे त्याचा वास्तविक घटना आणि नावांशी काही एक संबंध नाही .तस असेल तर तो निव्वळ योगायोग असू शकेल) हरिहरेश्वर माझा आवडत गाव .. गेले काही वर्ष मी इथ जवळच राहतो .सावित्री नदी जिथं समुद्राला मिळती तिथे हे गाव वसला आहे . भगवान शंकराच मंदिर ,मंदिराच्या मागच्या बाजूंला प्रदिक्षणा मार्ग तिकडे जाणारा पायऱ्यांचा य रस्ता आजूबाजूला चार टेकड्या या मध्ये वसलेला हे गाव . मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा, तिथून बीच वर चालत गेला कि लांब वर मी राहतो.तिथेच काही जण अजून राहतात . सहसा मी मंदिरा कडे जात नाही . मागे मात्र जातो तिथे खूप खोल घळयी आहेत लोक तिथे येतात फोटो काढतात .मस्ती करतात .काही जण तिथ बुडून मेलेत .समुद्र खोल आहे .कळत नाही किती खोल आहे . माझी ओळख करायची राहिली कि !,माझा नाव हरी !! उस्मानाबाद मध्ये मध्ये कॉलेज ला होतो .आमच्या गाव कडे समुद्र नाही त्या मुळे मला समुद्राची खूप ओढ होती ,समुद्रावर याव, मस्त ...
* रहस्य कथा * प्रवास वर्णन