"चला
शेवटी शनिवार आला एकदाचा ,आता रविवारची उद्या सुट्टी
!!"ऑफिस मध्ये कामाला सुरुवात करताना सकाळी त्याच्या मनात विचार आला आणि
मनातल्या मनातच तो खुश झाला.गेले काही दिवस कामाचा ताण इतका होता की त्यामुळे
कंटाळून गेला होता.मनातले विचार बाजूला करून म्हणला चला रोहन राव! आधी काम संपवा
आणि मग सुट्टी चा नियोजन करा ."असं विचार करत तो आपल्या कामात गढून गेला .
दुपारी
लंच ब्रेक मध्ये रोहन ने whatsup वरून आपल्या जिवलग
मित्र केदार ला मेसेज केला "उद्या आपण फॅमिली सहित सकाळीतुझ्या गाडी ने औटिंग
ला जाऊ ,कुठे ते संध्याकळी
सांगतो ,मस्त पावसाळा सुरू झाला आहे छान आपल्या पोरांना ही चेंज होईल ,मेसेज
बघून रिप्लाय दे " मेसेज सेंड करून तो कुठे जावे या साठी "स्थळ संशोधन
"करू लागला .मोबाईल मध्ये सर्च करताना एक ठिकाण आवडलं "ताम्हिणी घाट
"
मागच्या वर्षीच सोलापूरतून पुण्यात
स्थायिक
झालेला असल्याने या परिसराची अजून त्याला जास्त माहिती न्हवती म्हणून आजून काय
माहिती मिळते ते तो बघत होता .केदार तसं येऊन पाच वर्षे झाली होती पण त्याला
फिरायचा एवढा नाद न्हवता त्या मुळे सगळं ठरवायचं डिपार्टमेंट आपसूक रोहन कडे होत
त्या मुळे जाण्याचा मार्ग पावसाळ्यातील निसर्गाचे फोटो आणी बरीच माहिती बघताना
त्याला काही हंटेड ताम्हिणी घाट असे सर्च रिझर्ट पण सापडले .हसत त्या कडे दुर्लक्ष
करत त्याने रूट मॅप आणि दुसऱ्या दिवशी चा नियोजन केला आणि आपल्या कामात
परत गढून गेला .
मोबाईल
ची रिंग वाजली ,केदार चा फोन होता " बोल कुठे जायच बे?
इकडं
बरं आहे जरा डोंगर दर्या आहेत पाऊस आहे जरा बघायला मजा तरी
असती,फक्कड ठिकाण ठराव मस्त मजा करू बायको अशी ही वैतागली आहे सारखा घरात
पोराला सांभाळून तिला आणि तुझ्या बायको ला पण चेंज ,अस ही त्या दोघी
चांगल्या मैत्रिणी आहेत.फक्त सकाळी लवकर जाऊ आणि दुपारी 3 पर्यंत माघारी
येऊ म्हणजे जर झोप पण काढता येईल." रोहन ने सांगितलं
"ताम्हिणी घाटात जाऊ लै भारी फोटो आहेत तिथले नेट वर बघितलं मी ,तुझी
नवी गाडी मला चालवायची त्या रोड ला ,रोड पण सामसूम असतो गाडी पळवायला मजा
येईल!"त्याच बोलणं मधेच तोडत केदार म्हणाला "अबे पण,त्या
घाटाच चा रेकॉर्ड चांगलं नाही काय काय ऐकलं आहे मला मध्ये तर एक
व्हिडिओ आला होता भुताचा! " रोहन जोरात हसत म्हणला "अबे येड्या तू पण
काय काय विश्वस ठेवतो बे ,काय नसतं तसलं ,असं ही त्या
भागात खूप वस्ती झाली आहे आणि उद्या रविवार त्या मूळ आपल्या सारखे खूप लोक तिकडे
जातील तू चल ,वैनी ना घेऊन आमच्या कडे लवकर ये आम्हला पिकअप
कर आपण नाश्ता पण बाहेरच करू " रोहन पुढे जास्त बोलण्यात जास्त अर्थ नाही हे
ओळखून केदारने "ठीक आहे उद्या सकाळी साडे सात ला भेटू 'असं म्हणून फोन
कट केला.
सकाळी ठरल्या प्रमाणे रोहन ला केदार ने
त्याच्या घरून पिकअप केलं रोहन ची बायको रोहिणी आणि केंदार ची बायको वसुधा ह्या पण
चांगल्या
मैत्रिणी झाल्या होत्या केदार ने गाडी रोहन ला चालवायला दिली.तशी सेकंड हँड पण
पाहिली वाहिली असल्याने एकहाती ती नवी गाडी रोहन चालवू लागला.काही
अंतर गेल्या वर पहिल्यांदा पेट्रोल भरून घ्यावं म्हणून पंपावर गाडी घेतली
तर एक चाकात हवा कमी वाटली म्हणून त्याने गाडी पेट्रोल भरून पंचर
च्या दुकानात वळवली
" साब टायर पंमचर है,ट्यूब
लेस है 5 मिनिट मे पंक्चर निकलता हू असं म्हणत त्याने चेक केले तर 2
खिळे निघालं "साब दो पंचार है" क्या रे तुम लोग तो खिले नही डालते रोड
पे?"रोहन ने चरफडत उगीचच चिडून पंक्चर वाल्याला विचारलं!! काहीच रिप्लाय
न आल्याने त्याने आपला मोर्चा केदार कडे वळवला "सकळी
सकळी नाट लागला!",
गाडी मध्ये रोहिणी वसुधा ला सांगत होती
"सासुबाई म्हणत होत्या आज चा दिवस वाईट आहे आजचं
भविष्य..."मधेच ते ऐकून रोहन तोडत रोहन म्हणलं 'गप
ग काही तरी तुमचं आपलं !,चला निघू! टायर चा काम झालं म्हणून ते
निघाले ,गाडी मध्ये मस्त धिंकच्याक गाणी चालू करून रोहन ने वातावरण पुन्हा
हलकं केलं मध्ये नाष्टा करून गाडी पिरंगुट च्या पुढे लागल्यावर जोराचा पाऊस सुरू
झाला .
सकाळची दहा ची वेळ असून ही ढग साठून
काळोख झालं रोहन ची छोटी मुलगी ऋतुजा आणि केदार चा मुलगा
कैवल्य हे दोघे दंगा करत चालले होते,गाडी मधेच गाण्यावर नाचत होते ते दोघे
एकदम काळोख झाल्यावर शांत झाले .कैवल्य केदार ला म्हणू लागला बाबा कधी येणार धबधबा
?" येईल बाळा थोड्या वेळात केदार ने उत्तर दिले .तो या अंधारात उगीचच
गडबडला सारखा झाला त्याला नेट वर वाचलेला ताम्हणी घाटाचे किस्से आठवायला लागले
.घाटात दिसलेले तथाकथीत भुत ,झालेले विचित्र अपघात या बद्दल चे
विचार त्याच्या मनात घोळत होते ,अचानक रोहन ने हसडलेल्या शिवी ने तो
भानावर आला.
"सकाळी सकाळी दारू पीत हुल्लड बाजी करत चाललेत
साले !गाडी घासली असती त्यांची मागून आपल्या गाडी ला" रोहन सांगत
होता."जाऊ दे ,तू सावकाश चालव "केदार ने उत्तर दिलं आणि
त्याने आपसूक गाडीत लावलेल्या साईबाबा च्या मूर्तीला नमस्कार केला त्याची खूप
श्रद्धा होती बाबा वर !
आता भरपूर गाड्यांची वर्दळ वाढत चालली होती
बाईक वर जाणारे कपल्स ,पोराचे पोरींचे घोळके,गाड्या च्या
काचा उघड्या ठेवून बाहेर लटकत हुल्लड बाजी करणारे तरुण पोर बघून केदार वैतागत होता
'च्यायला ,आपल्या गाडी खाली यायचा एखाद !"अस
स्वतःशीच पुटपुटला. रोहन केदार ला म्हणला "केदार गाडी मात्र भारी आहे रे तुझी
ही स्विफ्ट ,जास्त वापरली पण नाही ही अस दिसतंय
पहिल्या
मालकाने !,"हो रे डॉक्टर होता हीच मालक त्याला दुसरी गाडी
घ्याची होती त्या मुळे त्याने ही विकली"केदार ने उत्तर दिले .
पहिला
धबधबा आला तिथं प्रचंड गर्दी बघून त्यांनी ठरवलं पुढे जायचं अजून, गाडी
लावायला तिथं योग्य जागा न्हवती मुलांना घेऊन आत जाण जरा अवघड होतं .त्या पेक्षा
पुढे घाटाच्या तिथे असलेल्या धबधब्या कडे जाऊ अस विचार करत केदार ने गाड्यांच्या
गर्दीतून वाट काढत पुढचा रास्ता धरला .बरोबर बारा वाजले होते थोडं पुढे आला की तिथं बोर्ड
लागला ताम्हिणी ८ किलोमीटर ,एक मंदिर क्रॉस
झालं आपसूक देवभोळ्या केदार ने देवाला नमस्कार केला. अचानक थोडं पुढे जाऊन गाडी
बंद पडली .
रोहन ने पेट्रोल
चा काटा बघितला तर फुल्ल,गाडी ला स्टार्ट करत होता पण नुसता
इंजि आवाज कार्याचा पण स्टार्ट काही होईना . तेवढ्यात मागून एक स्विफ्ट हॉर्न चा
जोरात आवाज करत पुढे निघून गेली वैतागून त्याने बघितल नाशिक पासिंग ची सेम नंबर ची
ती पण स्विफ्टच होती .तिकडे दुर्लक्ष करत “ बॅटरी उतरली का काय ?”काळजी
च्या स्वरात रोहन ने केदार ला विचारले .केदार म्हणाला "अस कस होईल ?मागच्या
आठवड्यात तर सर्विसिग केलीय गाडी .चल आम्ही ढकलतो सगळे तू चालू करून बघ" ते
तिघं ही गाडी ढकलू लागले आणि मुलं फक्त गाडी मध्ये ठेवून रोहन गाडी स्टार्ट
कार्याचा प्रयत्न करू लागला. गाडी काही स्टार्ट होण्याचा नाव घेत न्हवती .
शेवटी
शेजारच्या हॉटेल जवळच्या झाडाखाली गाडी लावून त्यांनी नाईलाजास्तव जवळ एखादे
गॅरेज
आहे का हे बघावं म्हणून चहा पीत हॉटेल वाल्या ला रोहन ने चौकशी केली."साहेब
पौड ला मेकॅनिक मिळेल मध्ये आधी काही नाही "हॉटेल वल्याने सांगितलं .मोबाईल
वर गॅरेज सर्च करावेत तर एक ही मोबाईल ला नेटवर्क न्हवत .केदार च्या मोबाइल ला एक
ठिकाणी फक्त थोडं नेटवर्क होत.गाडी चे बोनेट उघडून इकडे
तिकडे बघून काही कळत नाही लक्षात आल्यावर शेवटी रोहन केदार ला म्हणाला तू थांब
याच्याजवळ मी मेकॅनिक ला घेऊन येतो".तो जाणाऱ्या एका गाडी ला लिफ्ट
घेऊन पौड ला मेकॅनिक ला घ्यायला गेला.दोन तास गेल्या नंतर केदार ला रोहन चा फोन
आला "एक मेकॅनिक सापडला त्याला घेऊनत्याच्या बाईकवर येतोय"
.
इकडे तोवर एक
वाजले होते.केदार ने मुलांना आणि आणी वसुधा रोहिणी ना जेवण करायला लावले आणि तो
स्वतः रोहन साठी थाम्बला.मुलं वैतागली म्हणून त्या दोघींना मुलं घेऊन जवळ चक्कर
मारून या आणि काही फोटो काढा असे सांगून तो हॉटेल वल्याशी गप्पा मारत बसलं.हॉटेल
वाला सांगत होता"साहेब आता खूप वस्ती वाढली आहे आणि शनिवर रविवार इकडे लोक
कायम येतात फिरायला .लोकांनी इकडे प्लॉट घेऊन बंगले पण बांधलेत .घाटात मात्र खूप
अपघात होतात .खूप काही बघायला मिळत आम्ही पण रात्री 8 नंतर हॉटेल बंद
करून घरी असतो.शक्यतो बाहेर पडत नाही.आधीच टेंशन त्यात असलं ऐकून तो अजून काळजीत
पडला.
"काय
कळत नहो राव नेमका काय झालंय ?"वायरिंग चा प्रॉब्लेम आहे पण नक्की
कुठं ते सापडत नाही पेट्रोल चा पंप सुरू होत नाही "एव्हाना मेकॅनिंक
येऊन 2 तास झाले होते आणि पूर्ण बोनेट आणि गाडी उघडून
झाल्यावर मेकॅकॅनिक हे सांगत होता.वरून पडणाऱ्या पावसात छत्री घेऊ उभारलेल्या
केदार ला रोहन म्हणाला "सोर्री यार मी इकडे आणायला नको होतं सगळ्या दिवसाची
वाट लागली" केदार म्हणाला" सॉररी मी म्हणलं पाहिजे बे माझी गाडी बंद
पडली".
अजून अर्धा तास गेल्यावर मेकॅनिक
म्हणाला साहेब गाडी इथेच ठेवून तुम्ही जावा .मी उद्या ऑटो इलेक्ट्रिशेन घेऊन येतो
आणि गाडी नीट करून तुम्हाला उद्या पुण्याला आणून देतो.आणून
देण्याचे एक हजार रुपय जास्तीचे होतील हे कबुल करून
त्याचे 4 वाजून
गेले होते त्या मुळे त्यांनी नाईलाजास्तव त्याला होकार दिला .माघारी लिफ्ट घेऊन
जाणे शक्य नसल्याने आणि त्या रोड ला एसटी पण तुरळक असल्याने त्याने मेकॅनिक ला एक
गाडी पुण्याला सोडायला अरेंज कार्याला सांगितली.मेकॅनिक ने तसे फोन करून ती
व्यवस्था केली .
आपली
स्विफ्ट गाडी हॉटेल च्या बाहेर झाडाखाली स्वतःच्या जबाबदारी वर लावून
चावी मेकॅनिक कडे देऊन हे लोक भाड्याच्या गाडीने आपल्या आपल्या घरी गेले.
सगळ्यांचा मूड आज गेला होता. मेक्यानिक कडून
कोथरुड ला रोहन च्या ऑफिस जवळ रोहन ने गाडी घ्यायाची असे ठरले .त्या नुसार त्याने आपले फोन नंबर मेक्यानिक ला दिले होते .
दुसरं दिवस उजाडला ,सकाळी रोहन आवरून सात वाजताच
नेहमी प्रमाणे ऑफिस ला निघाला .आठवड्याची सुरुवात असल्याने सकाळपासून कामात गढून
गेला . लंच ब्रेक मध्ये नेहमी प्रमाणे जेवण झाल्यावर इ पेपर वाचत असताना एक बातमी
तो डोळे विस्फारून वाचत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला “ साहेब बाळू मेक्यानिक
बोलतोय ,तुमची गाडी च काम झाल आहे .वायरिंग च प्रोब्लेम होता ,निट करून पौंडला
आणली आहे , कालचा आडवन्स वजा जाता तीन हजार झाले .माणूस पाठवून गाडी देतो त्याच्या
जवळ पैसे द्या! साहेब बातमी पहिली का तुमच्या सेम नंबर ची नाशिक पासिंगची स्विफ्ट
काल घाटात अचानक कोसलली त्यात २ कुटुंब खलास झालेत” समोर कॉम्पुटर तीच बातमी वाचत रोहन ला आठवले
तीच गाडी जेव्हा आपली गाडी बंद पडली तेव्हा आपल्याला पास करून पुढे गेली होती .आणि
त्यातील २ कुटुंबातल ६ लोक दरी मध्ये
जागेवर मृत पावले होते. रोहन च्या मनात विचार आला ‘गाडी जर बंद पडली नसती
तर तो नंबर आपला असता........ (समाप्त )

Comments
Post a Comment