मला भावलेली माणसे :
****आठरे-पाटील( नाना) ***
२००५ सालच्या दरम्यानची गोष्टआहे.मी पुण्यातून दुध डेअरी ची रिपेअरिंग ची काम करत असताना छोटी मोठी प्रोजेक्ट घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि मला नगर जिल्ह्यातलं एक गावामध्ये एक एजन्सी कडून जुनी मशीन्स १नवीन दुध डेअरी मध्ये बसवण्याच काम मिळाल होतं.मला सांगण्यात आल होतं कि तिथ जाऊन "आठरे –पाटील (नाना)" ना भेटा.
ठरल्याप्रमाणे मी त्या अडनिड गावी (आता नाव आठवत नाही गावाचं!) गेलो.आतापर्यंत ३ वर्ष झाले होते मी व्यवसाय सुरु करून आणि महाराष्ट्रातील बऱ्याच दुध डेअरी ना काम निमित्ताने जाण्याचा योग आला होता.त्या मुळे डेअरी चा चेअरमन कसा असतो हे चांगलाच माहित झालं होता. कुठल्या ना कुठल्या पक्षाची पार्श्वभूमी असलेल्या व पांढरे खादीचे कपडे,ती नवीन घेतलेली स्कर्पिओ किवा तत्सम गाडी, आणि बाकीचा लवाजमा, ऑफिस च्या बाहेर ताटकळत बसलेले कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने बसलेले लोक हे मी आत्ता पर्यंत पाहिलेले वास्तव होते.( अर्थात काही सन्माननीय अपवाद होते पण परिस्थिती साधारण सारखीच होती सगळी कडे) तोच दृष्टीकोन घेऊन मी ती डेअरी शोधत पोहचलो.
अर्धवट बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीत सकाळचं दुध कलेक्शन चालू होता . ७ -८ लोक दूधाचे क्यान्द टाकीत ओतत होते.त्यातल्या एका मध्यमवयाच्या माणसाला मी आठरे पाटलाना भेटायचय आहे हे सांगितलं.त्यांनी सांगितलं ऑफिस मध्ये बसा , एतील अर्धा तासात”! पुढील एक दोन तास तरी कुणी येणार नाही हे गृहीत धरून मी ऑफिस मध्ये वाट पाहत बसलो , ऑफिस म्हणजे काय तर एक खोली जिथे हिशोबाच्या वह्या ठेवल्या होत्या .एक संगणक १ कपाट बस्स!
काही वेळाने तो मघाचाच माणूस अंग झटकत आला.आणि चहा-पाण्याची चौकशी केली. मी पुन्हा विचारलं कि नाना कधी येणार आहेत ? त्यांनी उशीर झाल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करून विचारलं कि “बोला काय काम आहे ? मी आठरे पाटील !
आता मला मात्र चक्करच यायची राहिली समोरचा बंडीवर आणि पायजम्यावर असणारा माणूस साधारण ५०-६० लाख रुपये किमतीच्या दुध डेअरीचा चेअरमन आहे हे पचायला जरा अवघड गेल! आमची कामाची बोलणी झाली आणि यथअवकाश काम हि झालं पण नानानि माझ्या मनात मात्र कायमचं घर केलं ते त्यांची कर्तबगारीची कहाणी कळल्यावर.
सहकारी ब्याके मध्ये शिपाई असलेल्या या दहावी झालेल्या या माळकरी माणसाने गावात पशु आहार केंद्र सुरु केला तिथच एणाऱ्या शेतकऱ्याकडून दुध कलेक्शन सुरु करून स्वतःचा कलेक्शन सेंटर आणि त्यानंतर काही वर्षात १०००० लिटर ची स्वतःचा दूध डेअरी काढलीया शिवाय एक प्रिंटींग प्रेस,एक पतसंस्था सुरु करून गावातील १५-२० मुलांना रोजगार मिळवून दिला. हे सुद्धा कुठल्या हि आर्थिक आणि राजकीय पाठबळाशिवाय हे विशेष ! मी एकदा त्यांना विचारलं असता ते म्हणाले होते कि राजकारण हे आपल्यासारख्याच काम नाही साहेब आपण आपलं काम करावं ! दर ६महिन्याला पांडुरंगासाठी पंढरपूरची वारी करणारा हा माणूस एका छोट्या झोपडी वजा घरात राहत होता. ऑफिस मध्ये इंटरनेट कनेक्शन असून सुद्धा घरात tv पण वापरत नव्हता.सहकारी क्षेत्रात एवढं साध राहणारा माणूस मी तोपर्यंत पहिला न्हवता.
बरीच वर्ष झाली ,पुढे मी काही कारणांनी दुध डेअरीची कामे घेतली नाहीत त्यांमुळे त्यांचा संपर्क तुटला पण व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षण आणि पैसाच लागतो या गैरसमजूतिला माझ्या मनातून कायमच काढून टाकून मला एक प्रकारच बळ देणारा सहकारातल्या मी पाहिलेल्या एका सच्च्या व्यावसाईक मात्र माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.

Comments
Post a Comment