A man with only hand
आज रात्री माझ्या वर्कशॉप वर night शिफ्ट चालू असल्यामुळे मी पण थांबून माझा काही काम करत बसलो. laptop वर संदीप माहेश्वरींच्या स्पीच ची एक क्लीप लाऊन ठेवली होती, ती ऐकाताना त्यातील एक कथा फार आवडली म्हणून ती शेअर करतो आहे.
हि कथा आहे क्यारली नावाच्या हंगेरियन सैन्यामधल्या एक पिस्टल शुटर ची. त्याने पिस्टल शुटींग मध्ये मोठ नाव केलेलंआणि राष्ट्रीय स्तरावरच्या बऱ्याच स्पर्धा जिंकल्या होत्या.
१९३८च्या एका ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्याच्या उजव्या हातामध्ये ह्यांडग्रेनेड चा स्फोट होऊन तो हात कायमचा वापरण्यास अयोग्य झाला, ज्या हाताने तो पिस्तुल शुटींग मध्ये बक्षीस मिळवायचा तो हातच निकामी झाल्यावर एखाद्याने खरा तर त्या क्षेत्रातल करिअर संपवल असत .लोकांना हि असच वाटलंपण त्याने काय नाही त्या पेक्षा काय आहे या कडे लक्ष दिलं आणि दवाखान्यातून बाहेर पडल्यावर त्याने डाव्या हाताने पिस्तुल शुटींग ची प्रक्टिस सुरु केली .
१ वर्षाच्या प्रचंड प्रक्टिस नंतर तो १९३९च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने त्याच्या डाव्या हाताने प्रथम पारितोषिक पटकावले, आणि लोकांना तोंडात बोट घालायला लावले, त्या काळात त्याला खूप प्रसिद्धी मिळाली पण त्याला तेवढ्यावरच थांबायचा न्हवत. त्याचं लक्ष होत औलोम्पिक १९४० ची स्पर्धेत गोल्ड मेडल !
महायुद्धा मुळे १९४० ची औलोम्पिक स्पर्धा रद्द झाली.त्या वेळेस त्याचं वय होतं२८ वर्ष! पुन्हा हा तरुण ना हारता १९४४च्या ओलोम्पिक च्या तयारीला लागला ,दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धामुळे हि स्पर्धा पण रद्द झाली.पण हार मारेल तो क्यारली कसला?त्याने पुन्हा नव्या जोमाने १९४८च्या औलोम्पिक स्पर्धेची प्रचंड तयारी केली ती हि डाव्या हातानेच कारण त्याचा उजवा हात आता निरोपयोगी होता.
या वेळेस मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आला आणि पिस्तुल शुटींग मध्ये त्याने त्या वर्षीच गोल्ड मेडल मिळवलं ते हि वयाच्या ३८ व्या वर्षी !अजून हि त्याची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास इतका जबरदस्त होती कि त्याने पुढे १९५२च्या ओलोम्पिक स्पर्धेत भाग घेऊन पुन्हा एकदा गोल्ड मेडलच जिंकले आणि इतिहास रचला कारण तो पर्यंत ओलोम्पिक स्पर्धेमध्ये सलग दुसर्यांदा गोल्ड्मेडल मिळवणारा तो पहिला मानकरी ठरला ते हि फक्त कमकुवत अश्या डाव्या एका हाताच्या जोरावर आणि प्रचंड अश्या आत्मविश्वास व मेहनतीच्या जोरावर!!!(रात्री त्याचा हा फोटो हि विकिपिडीयावर त्याची माहिती घेताना मिळाला )

Comments
Post a Comment