**************************************************************************************************************
सुनिता:
“आज जरा मला अस्वस्थ वाटत आहे.थोडी चुटपूट ,घाबरल्या सारखा वाटत आहे .काही तरी बिनसल्या सारखा वाटत आहे.या बंगल्यात खाली कोणी तरी रहायला येईल अस दिसतंय.आज घरमालक कुणाला तरी घर दाखवयाला आला होता वरच्या मजल्यावर काही आला नाहीकुणाला तरी खालची बाजू दाखवून खालच्या खाली निघून गेला. आम्ही भाड देत नसलो म्हणून काय झाल ?आमच्या परवानगी शिवाय कुणाला भाड्याने अस कस देऊ शकतो ? ,बघायला पाहिजे त्याच्या कडे !! मी तर चांगली कजाग आहे पण माझा नवरा “अजिंक्य” त्याला तर हल्ली जाम घाबरतो आमचा घर मालक !! हा हा हा !! मला प्रसंग आठवून सुद्धा हसू येतय !!
अहो मी कोण हे सांगितलाच नाही मी सुनिता!! मी, माझा नवरा अजिंक्य आणि आमचा छोटा मुलगा नयन असे आम्ही तिघे राहतो या घरात!! जरा आडबाजूला आहे हा बंगला पण आम्हाला चालतो! इतकी वर्ष झाले राहतोय कसली म्हणून काळजी नाही वाटत इकडे ! अस हि बाप लेक दिवसभर नसतात रात्री येतात !माझ्या लेकराला खाली झाडाजवळ च्या झोपाळ्यावर खेळायला खूप आवडत!आधी पडेल का काय? हि भीती वाटत असायाची ,आता काही काळजी नाही वाटत ! उशीर झाला , कधी येतायत काय माहित ? आले आले दोघा हि आले !!
बघा आल्या आल्या पोरगा वर पण आला नाही बसला खाली झोपळा खेळत !.कसली म्हणून शुद्ध नाही, कार्ट नुस्त झोके घेत बसत !अजिंक्यशी नवीन बिऱ्हाडा बद्दल थोड बोलते आणि खाली नयन शी खेळायला जाते !!”
**********************************************************************************************************
अजिंक्य:
“काय कराव बर ?सुनीताने सांगितल्या पासून राग नुसता अनावर झालाय. उद्या येऊ तर दे! असा त्रास देतो कि बघूच किती दिवस राहतात !! सुनिता काही घर सोडत नाही,आम्ही आलो कि नयन बरोबर खाली झाडाच्या जवळ झोके घेत बसते !! किती वेळा सांगितला पोराबरोबर झोके घेत जाऊ नकोस ! रस्त्याने लोक येत जात असतात त्यांच्या नजरा वाईट असतात !.तशी ती सांभाळून घेईल म्हणा ,तरी आपला वाटत !! मोकळा रोड आहे, त्या मुळे माणसं गाड्या इथून जोरात चालवत असतात पण माझ्या सुंदर बायकोच्या जोराच्या झोका घेताना बघण्याच्या च्या नादात धडपडतात .
पूर्वी खूप चिंतेत असायची माझी बायको ! मी केलेल्या चुकांचे त्यांना दुष्परिणाम सोसावे लागले पण आता काही काळजी नाही आमचा तिघांचा कुटुंब सुखी कुटुंब !!! आम्हाला दुसरं कुणी लुडबुड केलेला आवडत नाही अजिबात !!!
*****************************************************************************************
घरमालक :
“हुश !!मिळालं एकदाचा भाडेकरू ! वडिलांनी त्यांच्या म्हातारपणी राह्यला म्हणून तो बंगला बांधला आणि वास्तुशांतीच्या च्या दिवशीच वारले !वास्तुशांती राहूनच गेली. नंतर बंगला रिकामा नको म्हणून वरच्या मजल्यावर भाडेकरू घातले आणि चूक केली. भाड मिळायचं तर दूर पण नसती पिडा मागे लागली. जाऊ दे आता खालचा मजला परत एकदा आज दिलाय भाड्याने.! हे कुटुंब किती दिवस राहता काय माहित ?माझा हा कपड्याचा धंदा बघू का त्या बंगल्याचा बघू? पप्पानि एवढा धंद्याचा व्याप ठेवून गेलेत मागे त्यात या बंगल्याची कटकट !! विकाव म्हणला तरी कोणी घेत नाही !. असो उद्या येऊन भाडेकरू निट राहावे म्हणजे झाला !!!
***********************************************************************************************************
रोहिणी:
प्रशांत ची बदली या शहरात झाली आणि आम्ही या शहरात बदली करून घेतली इथ राह्यला घर मिळव म्हणून किती फिरलो पण स्वस्त भाड्यात काही कुठे जवळ फ्ल्याट मिळत न्हवता .कुणाच्या तरी ओळखीने प्रशांत ला हा बंगला भाडयाने मिळाला .काहीहि diposit न घेता त्या भल्या मालकाने काल आम्हाला दिला पण !! माझा नवरा म्हणाला “नशीब चांगला आहे रोहिणी आपला !!”
आज सगळं समान घेऊन आम्ही इथे शिफ्ट झालो .एक माणूस साफसफाईला यायला तयार न्हवता !! आज सगळ्या पाच हि खोल्या साफ करता करता नाकीनऊ आले. बहुतेक वरच्या मजल्यावर हि तेवढ्याच खोल्या असतील पण आपला काही वर जायचा संबध नाही म्हणा आहे ह्याच खूप आहेत खोल्या ! पण बाहेर चा तो झोपळा मात्र छान आहे .प्रशांत ऑफिस ला गेला कि मला काय काम आहे ? मस्त झोके घेईन !! पण इथे एक वेगळीच शांतात आहे आणि बाहेर ते मधेच येणारे आवाज !!! जाऊ दे झोपते आता !!
***************************************************************************************************************
सुनिता:
“खाली लोक राह्यला आलेत आज ! ,माझ लेकरू बिथरलय , खाली खेळायला गेला नाही !मीच एकटी रागाने झोपाळा खेळत बसले किती तरी वेळ!! अजिंक्य जोरात तरातरा वर येरझार्या घालत होता त्या मुळे अस वाटत होता कि अक्खा घरचा छप्पर हलतंय !.माझ्या नवर्याचा रागच फार बाबा !!आज काय करून बसेल सांगताच येत नाही ! मीच एकटी त्या बाईला सांगू का कि इथे राहू नको आम्हला इथे आमच्या शिवाय दुसरं कोणी राहिलेला चालत नाही !!. नाही तर आम्ही तिघे हि जाऊन त्यांना आत्ताच समजावतो कि तुम्ही उद्याच्या उद्या हे घर सोडा !!”
***********************************************************************************************************
घरमालक :
“सकाळी सकाळी ते कालच राह्यला आलेल भाडेकरू कुटुंब आमच्या घरी आल “मालक आम्हाला नाही राह्यचा या घरात आम्ही जातोय घर सोडून ते advancs भाड तुम्ह्लाच राहू दे ! पण तुम्ही आमचा समान आम्हाला आणून द्या !” .
हि आठवी वेळ आहे कुणी हि भाडेकरू तिथे टिकत नाही. सगळे घाबरून पळून येतात.वैताग आलाय नुसता ! नवीन भाडेकरू राह्यला गेला कि रात्री म्हने अजिंक्य आणि सुनिता त्यांच्या पोरासहित भेटतात आणि शांतपणे इथे राहू नका! असे सांगतात आणि त्यांची सगळी कथा सांगतात .दुसर्या दिवशी घर सोडून लोक घर सोडून पळून जातात !!कस शक्य आहे? कस शक्य आहे ?कारण.....................
ते तिघा तर विष पिऊन ८ वर्षापूर्वी घरात मृत सापडले होते.
पप्पा गेल्यावर खालचा मजला आम्हला कधी तरी निवांत राह्यला म्हणून ठेवून आम्ही वरचा मजला अजिंक्य आणि त्याच्या छोट्या परिवाराला भाड्याने दिला होता.अजिंक्य तसा कामसू माणूस पण कळत नसताना शेअर मार्केटच्या नादाला लागला आणि भयंकर कर्ज करून बसला !!.लोक दाराशी येतायत म्हणल्यावर सहन न होऊन बायकोला आणि पोराला विष पाजून स्वतः पण पण आत्महत्या केली .प्रकरण निस्तरता निस्तरता माझे खूप पैसे गेले .शिवाय आता त्या बंगल्याला भाडेकरू पण मिळत नाही आणि मिळालं तर आजच्या सारखा सेम भाडेकरू घाबरून येतात आणि त्यांना हे तिघे दिसल्याचे सांगतात .त्या रस्त्याने येणारे जाणारे पण सांगतात रात्री झोपाळा आपोआपच जोरात हलत असताना दिसतो !!” .आता बस झाला बंगला पडून टाकतो किवा तिथ वस्तू शांती करून विकून टाकतो ... !!!!!
*****************************************************************************************
सुनिता :
आता कस मस्त वाटत आहे कुठल्या हि माणसाची कट कट नाही !!.माझं लेकरू रात्र भर झोका खेळत बसेल , मी आणि आजिंक्य त्याला बघत बसू !गेल्या आठ वर्षापासून आम्हाला त्रास द्यायला कोणी नाही .आम्ही हि कुणाला त्रास देत नाही !न पैश्याची चिंता न कसलीच काळजी ? आम्ही तिघे ,हा बंगला ,आणि तो जोरत झोके घेणारा तो झोपळा................कुर कुर कुर कुर कुर करत आवाज करत माझ्या लेकराला खेळवणारा ......!!!!!!
****************समाप्त************************

Comments
Post a Comment