एक महिना होत आला होता
त्याला इथ duty ला लागून !! गावाकडे दुष्काळामुळे शेतीत काय करता येत न्हवत आणि
शिक्षण १२ वी झाली होती काही तरी जगायला काम केला पाहिजे म्हणूनं मग तो पुण्यात आला .गावातलाच एक माणूस
इथल्या सिकुरीटी कंपनीत कामाला होता त्याने याला हि तिथच चीकटवल आणि त्याच्या जवळच
एक पत्राची खोली ओळखीने भाड्यानी दिली होतीं त्याच्या बायकोला पण चार धुण्य
भांड्याची काम मिळाली होती तीन वर्षाच पोरगा शेजारचीकड ठेऊन ती काम करून यायची, कस
तरी दिवस ढकलले जात होते इतकाच !
आता सहा महिने झाले होते
पुण्नयत येऊन , कंपनीचा साहेब दर दोन महिन्याला
डूटा बदलायचा ! सायकल सोडून त्या कडा वाहन न्हवत म्हणून कंपनीचा सुपरवाझर त्यातल्या त्यात जवळची डूटी द्यायचा. सोसायट्या मधला काम बर असायचा बसून
राह्यचा , येणाऱ्या जाणार्या माणसांची, गाड्यांची रजिस्टर वर एन्ट्री करून घ्याची
काम करणर्या लोकावर लक्ष ठेवायचा बस एव्हड काम होता .आत्ता पर्यंत तीन सोसायट्या झाल्या काम करून या महिन्यापासून
मात्र सुपरवायझर ने एक हॉटेल च्या बाहेर duty लावली होती. गावाकडच्या हॉटेलपेक्षा
लई भारी हॉटेल, वडापाव सारखाच बर्गर का काय म्हणत्यत त्याच हॉटेल ,त्या बरोबर
आईस्क्रीम,कोल्ड्रिंक काय काय लोक खातेत ,कॉलेजचे पोर ,जोडपी, घरदार एकत्र येतेत ,खायची
प्याची, आत खेळायला पण आहे तिथ बारकी पोर खेळत असतेत.बाहेर एक बाकड्यावर एक
सर्काशीतल्या जोकर सारखा पुतळा ठेवला होता त्याच्या शेजारी बसून लोक मोबाईल वर
तोंड वेडे वाकडे करून फोटो काढ्याची .
लांबून उभा राहून ती सगळी मजा बघताना त्याच्या
मनात यायचं “या पुतळ्याचा बर आहे ,मस्त बसून असतो बाकड्यावर, आम्हाला वाचमन ला
मात्र आठ तास उभा रहाव लागत. साध पाणी पण आत जाऊन घेता येत नाही. या सहा महिन्यात
मला नावाने तसं फक्त सुपरवाईझर आणि एक दोन लोकच हक मारतेत बाकी सगळे एकाच नाव
म्हणतात -वाचमन!!”.
मघाशी एक कुटुंब त्याच्या
समोरून , डोक्यावर टोप्या फुगे आणि केक खात गेले .कुणाचा तर आज वाढदिवस होता
त्यातल्या बहुतेक ,ते बघितल्यावर त्याला आठवल, आपल हि पोरगा आज तीन वर्षाच झाल.पण
आपण तर काहीच केला नाही पोरासाठी , या महिन्याच्या पगार झाला कि इथल्या म्यानेजर
ला सांगून ते बर्गर का काय ते नक्की घ्यायचं त्या बरोबर ते फुगे आणि छोटी खेळण पण
विकत घ्याची, किती का महाग आसना! . मघाशी
गेलेले साहेब त्याला जास्त आवडायचे कारण या महिन्यात जवळपास दर रविवारी संध्याकाळी
ते त्यांच्या लहान मुलाला आणि मुलीला घेऊन
यायचे तिथ त्यांचे मुल खेळायचे, खायचे आणि जाताना हातात छोटे छोटे खेळणे घेऊन
जायचे . त्यांची मुल भारी होती जाताना मला बाय बाय करायची, साहेब तर गाडी रिवर्स
घ्यायला मदत करतो म्हणून “थ्यांकू” म्हणयचे .एकदा तर त्याच्याशी पाच मिनिट गप्पा मारत त्याच्या बद्दल आणि
त्याच्या मुलांबद्दल पण विचारलं.एवढ आपलेपणा तसा त्याला कमीच मिळायचा !!
हॉर्नचा आवाज आला तेव्हा तो विचाराच्या तंद्रीतून जागा झाला समोर
मघाचेच साहेब आणि त्यांची मुलगी होती. साहेब गाडी लाऊन परत हॉटेल मध्ये गेले आणि
नंतर काही वेळाने आतून त्यांच्या मुलीच्या
हातात १ फुगा , छोट खेळण आणि मोठा पाकीट होत ते परत त्याच्या जवळ येऊन आले आणि साहेबांची मुलगी त्याच्या जवळ येऊन म्हणाली “ काका हे
घ्या तुमच्या मुलाला आमच्या काढून
गिफ्ट!!” एवढ म्हणत ते बाप लेक गाडीत बसून निघून हि गेले. आयुष्यात पहिल्यांदाच मुलाच्या
वाढदिवसाच”गिफ्ट” मिळाल्याचा आनंद त्यच्या चेहऱ्यावर एक अश्रू च्या रुपात बाहेर
पडला ,कार च्या मिरर मध्ये साहेब त्याच्या चेहर्यावरच आनंद बघत होते ......

Comments
Post a Comment