Skip to main content

आत्म्यांचा मॉल

        सगळं आकाश ढगांनी व्यापून गेल होत, एव्हानारात्र झाली होती तो झप झप पावल टाकत रस्त्यावरून निघाला “कधी पण पाऊस सुरु होईल आता आडोसा शोधला पाहिजे,शहरात येऊन आज तिसरा दिवस आहे अजून राहायची सोय नाही झाली पोटाची तर आबाळच आहे वडापाव वर किती दिवस काढणार ?खिशात मोजून दीड दोनशे रुपये राहिलेत. आता रात्री STबस स्टोप वर पोलीस झोपू देत नाहीत. काल रात्री तर कपड्याची ब्याग चोरीला गेली आणि पोलिसाने काठी मारून उठवून हाकलून दिले ते वेगळ , एवढ मोठ शहर पण अजून आपल्या ओळखीच कोणी भेटलं नाही ,एक परीने बराच आहे म्हणा नवीन सुरुवात करायाची आहे आयुष्याची, सगळ्या नवीन ओळखी असाव्यात जुनी ओळख नकोच !”

      ‘’कड्डाड” करून वीज कोसळली आणि जोराचा पाऊस सुरु झाला.धो धो पावसात त्याने इकडे तिकडे बघितले .आपण नक्की कुठे आहोत हेच त्याला काळात न्हवते .येव्हडे मोठे शहर ,भटकत कुठ आलो काय माहित?आपल्याला काय सगळं सारखाच !स्वतःशीच त्याने हसत विचार केला “चला अनिलराव ,आडोसा शोधा! भिजला आहात तुम्ही!” वीजाच्या प्रकशात समोर बघितला तर एक बांधकाम अर्धवट राहिलेली खूप मोठी इमारत होती आत कोणी चिटपाखरू दिसत नव्हती आणि लाईट पण नव्हती. एका हातात घेतलेला भजी पावच पुडक आणि पाण्याची बाटली सांभाळत त्याने त्या इमारतीत आसरा घेतला .पावसाने जोर धरला होता.आता सगळी कड पाऊस धुवाधार पडत होता .समोर च काही दिसत न्हवता .नाही म्हणायला रोड वरून जाणार्या गाड्याच्या लाईट मध्ये रस्ते चमकत होते.

        आज इथच मुक्काम करू ,कुणी आला विचारयला तर बघू अस विचार करत तो इमारतीच्या आत, अजून आत शिरला ”कसली बिल्डींग कसली आहे काय माहित ?” बघू सकाळी ! स्वतःशीच पुटपुटत त्याने आतल्या मोठय मोठ्या खोल्यात फिरत होता .किर्र अंधार आणि मधेच चमकणाऱ्या विजांमध्ये त्या सगळ्या खोल्यांमध्ये दारू च्या बाटल्या ,फाटके कपडे ,बीडी सिगारेटची थोटक पसरली होती आणि अजून बराच काही समान पडला होत ! ,आयला दिवसा आडोसा बघून मवाली लोक येतेत जातेत दिसतय ! पोटात कावळे ओरडत होते म्हणून त्याने आधी हातातल भाजी पावाच पुडका फोडल आणि बका बका तोंडात भजी कोंबत सुटला ,मधेच बाज्याच्या गाड्यावर भरून घेतलेल्या पाण्याची बाटली तून पाणी पिताना त्याच्या तोंडाचा आवाज सोडून तिथ कसलाच आवाज येत नव्हता .नाही म्हणायला लांब बाहेर पडणारा पाऊस आपला अस्तित्व दाखवत होता .

          “अब्ब’ स्वतःच्या भल्या मोठ्या ढेकरीच्या आवाजाने त्या निरव शांतते मध्ये क्षणभर तोच दचकला. पोटली आग शांत झाल्यावर आता त्यला जरा इकडे तिकडे बघू वाटले.इकडे तिकडे बघितल्यावर त्याला एक माचीस ची डब्बी दिसली मग तिथलीच एक अर्धी जळलेली सिगारेट उचलून घेत तिला शिलगावली आणि एक लांब झुरका घेतला .आपण फिरत फिरत इमारतीत जरा जास्तच आत आलो हे त्याला कळाल.तो इमारतीच्या मध्य भागी उभा होता बाजूने खूप सारे मोठ मोठे गाळे अंधुक दिसत होते . अस हि अंधाराची किवा कशाचीच तशी त्याला भीती न्हवतीच पण आत इथ अंग टाकायला चांगली जागा शोधली पाहिजे याचा विचार करून त्याने आजूबाजूला जरा नजर टाकून तिथ पडलेल्या एका सळइला एक पडलेला फडका गुंडाळल तितल्या दारू च्या बाटल्या गोळा करताना एक अर्धी बाटली देशी दारू च बाटली दिसली “ आईला ,लोटरी लागली कि अस म्हणत त्याने बाटली तोंडला लावली थोडी दारू त्या सळइला गुंडाळलेल्या कापडावर शिपडून त्याने तो टेंभा पेटवला .सगळा तो भाग एकदम उजळून निघाला.

             त्या प्रकाशात त्याला त्या इमारतीची भव्यता आता स्पष्ट दिसली ४ माजली बिल्डींग होती आणि मध्ये मोठाच्या मोठा मोकळा भाग जिथं तो उभा होता. वर इमारतीच्या चात्कड बघितला तर वर काचा लावलेल्या होत्या. पिचर मध्ये बघितलेला मॉल म्हणजेच असली बिल्डीग असती.नायका ? स्वतःशीच त्याने विचारलं आणि एक विचार मनामध्ये आल्यावर तो हसला “माझ्यासारख्या किती जणांना इथ राह्यला साध एक छप्पर नाही आणि हि अखी बिल्डींग मोकळी पडलीय .आपल्या सारखा अजून इथ कोणी असल का ?असा विचार करून त्याने जोरात हाक मारली “ आर ..इथ कोण हाय का ?” त्या निरव शांततेत लांबून जोरात हसण्याचा आवाज आला आणि तो आवाज वाढतच गेला .....

              अनिल आवाजाचा कानोसा घेत हातात टेंबा घेऊन पुढे पुढे सरकत होता .भीती तशी त्याला वाटत नव्हतीच तरी पण सुरक्षा म्हणून हातात एक वीट घेऊन तो पुढे पुढे सरकत होता .गावात तालमीत कमवलेल शरीर आणि पिढीजात व्यवसाया मुळे भीती चा लवलेशच नसलेला अनिल तसा बेडर होता .हसण्याचा आवाज खाली तळमजल्या खालून येत होता .आवाजाच्या दिशेने जाताना तो भेसूर आवाज म्हणाला “ सावकाश ये रे बाबा इथ कुठ पण मृत्यू घिरट्या घालत असतोय .” ते वाक्य पूर्ण होईतो अनिल च्या पायाशी सळसळ झाली . थोड दुर्लक्ष झाला असता तर अनिल चा पाय त्या काळ्याभोर मोठ्या सापावर पडला असता .सळ सळ करत तो साप पुढे दिसेनासा झाला होता. चाहूल घेत त्या जाळ्याजळमटातून वाट काढत जाताना त्याच्या मनात विचार आला “ एवढ्या अडचणीत येऊन बसलेला माणूस एक तर वेडा असेल नाही तर ...” .

       खाली त्याला त्या अंधारात तळमजल्याच्या कोपर्यात एक जाक्खड म्हातारा बसलेला दिसला .अंगात एका वर एक घातलेले कपडे, वाढलेलं दाढी, आणि सगळी कडे पसलेली दुर्गंधी त्यावरून अनिल ने ओळखला हा कोणी तरी भिकारी असावा .अनिल त्याच्या जवळ आला आणि म्हणला “ काय म्हातारबा ,इतक्या खाली का येऊन बसला हयात ? इचुकाटा हैती , चावल कि, मरून पडलेला पण कळणार नाही .अस म्हणत अनिल हसला .ते म्हातारबुवा पुन्हा भीषण हसले आणि म्हनाले “ पोर इचुकात्याला काय घाबररायचा ? माणूस त्या पेक्षा जास्त विषारी बघ !! माणसापासून इथ लांब लपून बसायचा !आता असा हि विचु काटा मला काही करू शकत नाही .ते सोड कुठून आलास आणि इथ काय करतोय ? तू पण काही शोधायला आलाय का ? हे विचारताना त्या म्हातार्याचा आवाज कठोर आणि भीषण होत होता .

        “ नाही बा म्हातारबा , आवो ४ दिवस झाले गावाकडून आलोय कामासाठी .राहायला जागा नाही, काम नाही,गेली चार दिवस इथ तिथ झोपून दिवस काढतोय,काल रात्री बस स्टोप वर कपड्याची ब्याग पण चोरीला गेली .पावसात भिज्यला लागलो म्हणून इथ आलो चुकून !”. “हम्म ! इथ भीती नाही का वाटली पोरा तुला ?” म्ह्तारबा न पुढा प्रश्न विचारलं .अनिल हसला आणि म्हणला मला अंधाराची आणि एकट राहायची सवाय है” आई बाप दोघ बी मेलेत आता गावात कोणी नाहीय .आम्ही स्मशानाच्या जवळ राहत होतो .बाप लोकांची मढ जालयाचा ,त्याच्या सरपणाच आणि कामाची लोक पैसे द्यायचे.मेलेल्या माणसाचे कपडे ,आमच्या घरात आम्हाला मिळायचे.कधी मधी मढयाच्या अंगावरच सोन पण सकाळी चितेत सापद्याच मग आमच्यात मटणाचा बेत असायचा ,बाप दारू प्यायचा ,मेला एक दिवशी!

              मधेच सांगायचा थांबून अनिल म्हणला “म्हतारबाबा, जरा शेकोटी पेटवतो ,तुम्हाला थंडी नाही का वाजत? मी पुरा भिजलोय जरा उब लागल आणि आणि माझे कपडे पण वाळतील, रात्रीचे १२-१ तरी वाजले असतील अस स्वतःशी पुटपुटत त्याने टेंब विझायाच्या आधी शेकोटी पेटवावी म्हणून पटापट बांधकामाची पडलेली लहान लाकड गोळा केली आणि जवळच्या माचीसिनी आणि तिथ पडलेल्या फाटक्या चीध्यानी शेकोटी पेटवली आता चांगली धडधड शेकोटी पेटली .बाहेर पाऊस थांबला होता.पुन्हा शेकोटी जवळ बसला

              “ पुढ?” म्हतार बा च्या प्रश्नाने अनिल मनातल्या मनात खुश झाला त्याच कोणी तरी गेल्या काही दिवसातून ऐकून घेत होता. तो पुन्हा आपली कहाणी सांगू लागला “मी बी बा बरोबर रात्री प्रेताजवळ प्रेत जळत असताना थांबून राहयचो.मयताचे नातेवाईक निघून जायचे पण आम्हाला जग रहाव लागायचे ,तांत्रीक,कोल्हे कुत्रे येऊन प्रेत उचाक्यची भीती असती मग एकदा एक मांत्रिकान एक बाईच्या प्रेताच मुंडका तोडून नेला होत ,बा ला लोकांनी लई मारला होता .मी जाणता झालो होतो मग मीच तिथ बसला लागलो . मी व्यवस्तीत सगळं करयचो तिसर्या दिवशी सकाळी धगीतून नातेवाईकांना हाडका काढून द्याचो तेव्हा लोक मानाने चार पैसे देत असायची .

             बाप मला म्हणायचा “ पोरा हे तू करू नको .हे मुक्तीच काम आहे आपण पिढी जात लोकांना मुक्ती देतोय पण आता तू हे सोड शहरात जा दुसरं काही काम कर पण हे काम करू नको.त्यात मी पायाळू हाय त्या मूळ मला भूत दिसतील त्रास देतील अस बा ला वाटत होत. मला एकट रात्री प्रेतापाशी बसल्यावर कधी भूत दिसली नाहीत रात्री कोण न कोण माझ्या शेजारी गप्पा मार्याला येऊन बसायाच ,गावातली नसायची टी लोक पण बाहेर गावची असतील, दर वेळेस प्रेताजवळ बसलो कि रस्त्याने रात्री जाणारा एक तरी माणूस माझ्या शेजारी बसून राह्यचा .पाहत होणाच्या आधी निघून जायचा एक दोन दा तर बाई माणूस पण येऊन बसले होते .बाप मेला आणि मी घरातला एकटा राहिलो” काही महिने पाटलाच्या शेतात सालावर काम केला पण तिथ मन रमत न्ह्व्हता .म्हणून मग चार दिवसापूर्वी शहराचा रस्ता धरला .तर असा आहे बघा सगळं !” एका दमात अनिल ने आपली कहाणी म्ह्तार्बा ला सांगितली.

            म्ह्तार्बा मघा सारखा जोरात हसायला लागले .ते हसणं आता जास्तच भीषण वाटत होत.म्हातारबा धीरगंभीर स्वरात म्हणले “ पोरा,तुझ्या नशिबाने परत तुला तिथच आणून सोडलाय .तू मुक्तीदाता आहेस .म्हणून तुला भूत खेताचा त्रास झाला नाही.तुझ्या नशिबात तेच काम आहे दिसतय.” अनिल ने चमकून प्रती प्रश्न केला “म्हणजे ?”म्ह्तार्बा म्हणले “कळेल तुला लवकर! ऐक उद्या सकळी त्या कोपर्यात एक पेटी आहे ती उघड त्यात काही पैसे आणि कपडे आहेत ते घे! तेव्हाच तुला एक काम करावे लागेल .तुला बरोबर कळेल काय करायचं आहे ते .आता हि इमारत सोडू नको इथ थांबून तुला बरीच काम कार्याची आहेत .तुझी इच्छा नसेल तरी तुला आता ते करावे लागेल नियती ने तुला त्या साठीच इथ आणून सोडला आहे” म्ह्तार्बा बोलत असताना अनिल ला झोप कधी लागली कळल नाही.फक्त त्याला डोळे खूप जड झाले होते आणि त्या झोपाळू डोळ्यात त्याला आपल्या बरोबर शेजारी खूप लोक बसले आहेत असा भास झाला पण तोवर तो झोपी गेला होता.

          अनिलला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती त्याने इकडे तिकडे पहिले तर त्याच्या जवळ कोणी हि नव्हते. डोळे बंद होत असताना त्याला म्हातारबा नि एक दिशेला हात करून तिकडे जाण्यास सांगितले होते आणि शेवटचे वाक्य त्याला आठवत होते “माझ्या शेजारचे बोचके उघड” !त्याने आता उजेडामध्ये सगळीकडे शोध शोध करायची ठरवले. मॉल च्या अजून मागील बाजूस तो चालू लागला. जस तो आत जाऊ लागला तस एक सडका उग्र दर्प त्याला जाणवू लागला.एका कोपर्यामध्ये त्याने पहिले आणि त्याला धक्का बसला त्या कोपर्यामध्ये त्याला आदल्या दिवशी च्या रात्री जे म्हातारबा दिसले होते तेच कपडे असलेला एक सडलेला हाडाचा सापळा दिसला त्या शेजारी बरच कपड्यांचे गाठोडे दिसले.त्यातल्या एक मोठ्या गाठोड्याकडे त्याचे लक्ष गेले .अन म्हतार्बाचा वाक्य आठवले “माझ्या शेजारचे बोचके उघड”.

     त्याने ते बोचके उघडले त्यात त्याला एका कॅरीब्याग मध्ये पेपरचे कात्रण आणि वही सापडली आणि दुसर्या एका कॅरीबग्स मध्ये खूप सारे नोटाचे गोल बंडल होते.अनिल चे डोळे चमकले खिशात सगळे बंडल घालताना त्याला हसू आले विचार आला “इथ पण मढ कामाला आल !” त्याने आधी ते पेपरचे कात्रण सापडले होते ते वाचायाचे ठरवले सगळे कात्रण त्याने आधी तारीखवार लाऊन घेतले .त्या सगळ्या त्या मॉलसबंधीच्या बातम्या होत्या. बिल्डर ने स्मशानाशेजारचा हा प्लॉट एका धार्मिक ट्रस्ट कडून कसा बळकावला, इमारतीच्या बांधकाम सुरु केल्यावर काही सांगाडे कसे सापडले ,ते प्रकरण कसे दाबले गेले ,या सबंधित सामाजिक कार्यकर्त्यांचे कसे संशयास्पद रित्या गायब झाले.नंतर या मॉल च्या बांधकामात वरचा स्लाब कोसळून झालेला अपघात आणि अगदी अलीकडील एक बातमी त्यात होती कि बिल्डर चा याच मॉल मध्ये डोळे वीस्फारलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता . पोस्ट पोस्टमार्रटम अहवाल मध्ये हार्टआटाक ने मृत्यू अशी नोंद झाली होती त्या मध्ये यापण बातम्या होत्या ज्यात काही बातम्यांमधील फोटो मध्ये जे चेहरे दिसले होते तेच चेहरे काल झोप येत असताना त्याला शेजारी दिसले होते.

              तो आता सर्व समजून चुकला होता काल रात्री भेटलेले म्हातारबा कधीच इथे मरून पडले होते. त्यांचा आत्मा त्याला संदेश देण्यासाठी काल आला होता .आता त्याच्यातला मुक्तीदाता जागृत झाला काही गोष्टी मनाशी ठरवून तो बाहेर पडला.त्याने रात्री न दिसलेला वाचमन इमारतीच्या बाहेर दिसला त्याने उलट अडवले आणि घाबरत विचारले कि रार्त्री तू इथे काय करत होतास आणि जिंवंत कसा काय राहिला?

अनिल ने आदल्या दिवशी ची फक्त आपण आत का गेलो तेवढीच हकीकद त्याला सांगितली आणि आता त्याने बिल्डर च्या इतर पार्टनर न भेटायची इच्छा त्या वाचमन जवळ व्यक्त केली.वाचमन त्याची इच्छा ऐकून जोरजोरात हास्याला लागला.”अरे येडा झाला का तू? एवढे मोठे साहेब लोक तुला कशाला भेटतील .अस हि सगळं धंदा आता साहेबांचा मिसेस madam बघतात ,चल निघ इथनं ,!येडा कुठला”एक तर इथ रात्री चा वाचमन मिळत नाही बाहेरची सिकुरीटी कंपनी पण हे काम घेत नाहीय . आपण ऑफिस चे वाचमन असून इथ दिवसा काम कराव लागत” अस पुटपुटत वाचमान ने त्याला हाकलून दिला.


              शेवटी मनोमन काही गोष्टी ठरवून अनिलने ऑफिस चा पत्ता बाहेर असलेल्या बोर्ड वरून घेतला आता जवळ पैसे हि होते त्या मुळे त्याने आधी काही कपडे आणि आवश्यक सामानाची खरेदी केली आणि एका स्वस्तातल्या लोज मध्ये जाऊन तिथे व्यवस्थित अवरा आवर करून रिक्षाने ते ऑफिस गाठले. “ म्वाल च्या नाईट शिफ्टला तुम्हाला वाचमान पाहिजे कळल म्हणून आलोय” गेल्या गेल्या ऑफिस च्या रिसेप्शन वर त्याने एका दमात सांगितले . रिसेप्शन ने त्याला पहिले ,वाचमन म्हणून तो योग्य दिसत होता दणकट शरीयाष्टी ,उंची आणि नवीन कपड्या मुळे तर तो सिव्हील ड्रेस मधला पोलीसच वाटत होता .तिने त्याची माहिती विचारून HR च्या म्यानेजर ला भेटायला पाठवले .

        “ या आधी वाचमन म्हणून काम केला आहे का ?” म्यानेजर ने विचारलं “नाही” अनिल च उत्तर आला . तुमच्या कडे अनुभव नाही तुमचे काही कागदद्पत्र नाहीत तुम्हाला त्या कामासाठी आम्ही कस काय ठेवावं! “साहेब माझ्या गाव कड चौकशी करा आधार कार्ड होत ते काल ब्याग बरोबर चोरीला गेल” म्यानेजर हासायला लागला आणि म्हणाला ”तुमची ब्याग तुम्हाला सांभाळता येत नाही तुम्ही आमची इमारत काय साम्भालणार?” अनिल ने शांत पणे उत्तर दिले “साहेब मी काल रात्र भर त्या मॉल च्या बिल्डिग मध्ये मुक्काम करून आलोय !”

        आता HR चे तोंड बघण्यासारखे झाले होते “काय ?काल तुम्ही तिथ आत राहिला होतात?” “हो “ अनिल ने उत्तर दिले .मला त्या साठीच मोठ्या madam न भेटायचे आहे. बरेच अधे वेढे घेऊन HR म्यानेजर madam ची भेट घालून द्यायला तयार झाला त्याला बाहेर बसवून लगबगीन म्यानेजर MD च्या केबिन कडे निघाला .

“मॉल चा प्रोजेक्टहे माझा स्वप्न आहे राधा ! हा पूर्ण झाला कि आपल्या कंपनी चे नाव या मुळे शहरातील मोठ्या विकासकांमध्ये गणले जाईल .त्या साठी जागा ताब्यात घेण्यापासून ते इन्व्हेस्टर गोळा करताना खूप काही तडजोडी कराव्या लागल्यात.बर्याच लोकांनी ती जागा मॉल साठी घेतली म्हणून भीती दाखवली , साईट वर काही घटना घडल्या हि, बांधमावरच्या लोकांना तिथ काय काय दिसत होत म्हणे !!आज साईट इंजिनिअर चा फोन आला होता एक बाजूला jcb ने खोदकाम चालू असताना तिथ हाडाचे सापळे मिळाले आहेत .मला आत्ता साईट वर जाऊन याव लागेल” आपल्याशी बोलत असताना साहेबनी हे सांगितला आणि साईट वर गेले ते माघारी आलेच नाहीत तिथ त्यांचा हृदय विकाराने मृत्य झाला .त्या नंतर सगळ्या घटना वेगाने घडल्या साईट वरच काम चालू असताना थाबला .हाडाच्या सापल्यांची बातमी बाहेर पेपरआउट ,इंवेस्तर पैसे माघारी मागत आहेत.मॉल मधल्या दुकानाचा बुकिंग थांबलाय .केलेला बुकिंग लोक कॅन्सल करत आहेत काही तरी वेळीच केला पाहिजे पण काय ? हे कळत नाहीय !” हताश पणे MD केबिन मध्ये राधा म्याडम विचार करत बसल्या होत्या .

          राधा म्याडम स्वतःच्या विचार विश्वात किती वेळ गुंग होत्या कोण जाणे तोवर दारावर टकटक झाली .”may I come In Madam?” HR म्यानेजर आला होता “yes, बोला काय काम आहे ?” राधा म्याडम नि प्रश्न केला .

           “madam एक वाचमन च्या नोकरीसाठी माणूस आला आहे.” HR ने सांगितल्यावर राधा म्याडम संतापून म्हणाल्या “आता ते पण मीच ठरवायचं का ?” ‘ नाही म्याडम तो मॉल मध्ये नाईट शिफ्ट च्या कामासाठी आलाय आणि काल तो तिथ चुकून राहिला होता त्याला तुमच्याशी खूप काही महत्वाच बोलायचा आहे” HR म्यानेजर ने एका दमात सगळे सांगून टाकले .विचार करून म्याडम ने सांगितले घेऊन या तुम्ही त्याला आत आणि हो तुम्ही पण इथे थांबा !” HR म्यनेजर ने तिथून रिसेप्शन मध्ये फोन करून शिपायाला अनिल ला घेऊन यायला सांगितले .

 दारावर टकटक झाली आणि अनिल ने विचारले “आत येऊ का ?”


              “नमस्कार म्याडम” अनिल ने ऑफिस मध्ये आत येऊन अभिवादन केले.मनात बरीच उत्सुकता असून हि म्याडम होता होईल तेवढा चेहरा निर्विकार ठेऊन म्हणाल्या “बोला ,तुम्हाला नोकरी हवी तर मला भेटायचे काय कारण आहे.काय आहे ते लवकर बोला माझ्या कडे वेळ कमी आहे”. “हो म्याडम ,तुमच्या कड वेळ कमीच आहे!” अनिल ने शांतपणे उत्तर दिले .”काय म्हणायच्या तुम्हाला ?” म्याडम आता चिडून विचारात होत्या. “म्याडम! काल मी चुकून तुमच्या बंद पडलेल्या बिल्डींग मध्ये असर्याला गेलो होतो तिथ ... अस करत अनिल ने त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला.म्याडम चा चेहरा ऐकता ऐकता आता पांढरा पडला होता.


          “मग आता ?मॉल कधीच सुरु होणार नाही का ? आम्ही तर खूप पैसा लावलाय हो यावर ,आम्ही बुडून जाऊ जर मॉल सुरु नाही झाला तर!! ,तरी तिथ अस काहि आहे या बद्दल च्या बातम्या आम्ही होता होईल तो दाबल्या ,पण लोकांचे मृत्यु आणि घडणाऱ्या घटना आम्ही थांबवू शकलो नाही तरी मांत्रिक तांत्रिक सगळे झाले पण काही उपयोग झाले नाही उलट त्या तांत्रीकांचे पण त्या ठिकाणी येऊन मृत्यू झालेत .काही तरी करा हो !!’ म्याडम सगळं अभिनवेश गळून अगदी काकुळतीला येऊन अनोळखी अनिल समोर बोलयला लागल्या. अत्यंत नम्रपणे हात जोडून अनिल म्हणाला “म्याडम ! मी तांत्रिक नाही हो ,पण माझ्याशी आत्मे बोलतात.मला तर आधी ते आत्मे आहेत हे पण माहित न्हवत !”अनिल ने त्याची गावाकडची पार्श्वभूमी पण म्याडम न सांगितली. सगळं ऐकून घेऊन म्याडम नि त्याला सांगितले “तुम्ही आमच्या या मॉल वरच संकट दूर करा मी तुम्हाला खूप पैसे देईन आणि सन्मानाने योग्य अशी नोकरी पण देईन”.

             “म्याडम मी नक्की प्रयत्न करीन फक्त आज मला तिथ रात्री राहायची परवानगी द्या आणि तिथ सोबत तुम्ही पण चला !!’ अनिल ची मागणी ऐकून म्याडम गर्भगळीत झाल्या “ नाही नाही मी नाही येऊ शकणार,तिथ गेलेला कोणी माघारी येत नाही ,माझ्यावर आता कुटुंबाची ,कंपनीची जबाबदारी आहे ,नको मी नाही येत तुम्ही एकटे जावा.” “म्याडम तुमची सगळी जबादारी माझ्या वर आहे, मी तुम्हाला सुखरूप घेऊन येतो माग ,काळजी नगा करू , माझ्या वर इतका विश्वास ठेवा !तीथ काही निर्णय घ्यावा लागला तर तुम्ही तिथ पायजेल !!”शेवटी हो न करत म्याडम तयार झाल्या.ऑफिस मध्ये ताताडीची मिटिंग घेऊन आपली कल्पना त्यांनी मांडली. सगळ्यांच्या विरोधाला डावलून म्याडम अनिलवर विश्वास दाखवून तयार झाल्या.

                         म्याडम नी घरातील सर्व लोकांना समजून सांगितल आणि रात्री साधारण 11 वाजता अनिल बरोबर मॉल कडे निघाल्या त्यांनी सोबत त्यांच्या गुरुनी दिलेला ताईत हि घेतला .बॉडी गार्ड न आणि सोबत आलेल्या इतर कर्मचार्यांना गेटवर ठेवून हे दोघे हातात टोर्च आणि काही आवश्यक सामानाची पिशवी घेऊन मॉल मध्ये निघाले .म्याडम मनातल्या मनात देवाचा धावा करत होत्या पुढे अनिल आणि मागे म्याडम असे निघाले मॉल च्या तळमजल्या कडे जाताना रातकिड्यांची किरकिर आणि वेगवगळे आवाज यांचा मिश्रण झाला होत त्यांच्या पावलाचे आवाजच त्यांना आता मोठा वाटत होता .म्याडम सगळं भीड संकोच बाजूला ठेवून अनिल ला म्याडम ने आपला हात धरून चालायची विनंती केली.

                    आत्ता बरोबर बारा वाजले होते आणि म्याडमना आसपास मोठ्यांदा भेसूर हसण्याचे आवाज येऊ लागले आजूबाजूला कोणी तरी फिरत आहे असे भास होऊ लागले.म्याडम अनिल चा हात घट्ट पकडून मनातल्या मनात गुरुनि सांगितलेला मंत्र म्हणत चालू लागल्या.अनिल ने त्यांना शांतपणे त्याच्या मागे चालण्याची खूण केली.आता ते त्या कुबट वास असलेल्या खालच्या पार्किंग च्या ठिकाणी आले.तिथून एक रस्ता मागे जात इमारतीच्या मागे जात होता अजून बांधकाम पूर्ण न्हवते झाले त्यामुळे मागे दिसणारे पटांगण स्पष्ट दिसत होते . “ तिला घेऊन इकडे ये!” एक कठोर आदेश दिल्या सारखा आवाज अनिल ला ऐकू आला म्य्दाम तर त्या आवाजाने थरथर कापत रडू लागल्या “ मला माघारी जाऊ द्या हो आता मला इथे थांबायचे नाही..please मला घेऊन बाहेर चला !” म्याडम गयावया करत अनिल ला विनंती करू लागल्या . ‘तू कुठे हि जाऊ शकत नाहीस चुपचाप इकडे ये !” अस तो आवाज आला आणि पुन्हा भेसूर हसण्याचा आवाज येऊ लागला .

                      अनिल त्यांना पुन्हा धीर देत त्या मोकळ्या पटांगणात घेऊन गेला तिथून थोड्या अंतरावर मॉल ची हद्द संपत होती आणि मागे भली मोठी स्मशान भूमी होती ओळीने असलेली थडगी तिथे दिसत होती तिथली शांतता भंग करत अनेकजणाचा हसण्याचा आवाज आता वाढत गेला आणि अचानक तिथे खूप सारे हाडाचे सापळे दिसू लागले ते बघून म्याडम ची तर दातखिळच बसली अनिल ने त्यांना घट्ट पडकून धरले आणि जोरात म्हणाला “ म्हातारबा ,कुठे है ओ तुम्ही? हे समदा कधी तरी थांबला पाहिजे न ! मी हात जोडतो ,तुम्ही काल विश्वास दावला म्हणून मी यांना इथ घेऊन आलो आता तुम्हीच काय तो मार्ग सांगितला पायजे न ?”

             “तू गप रे ,आम्ही हिला पण संपवणार जस हिच्या नवर्याला आणि त्या मांत्रिकांना,इथे आलेल्या सगळ्यांना संपवला.तुला हि संपवू ,मग आमच्या बरोबर राहिला कि कळेल कि कस आमचा आत्मा मुक्ती साठी धडपडतोय ,आमची प्रेत पण बाहेर काढली गेली या बांधकामाच्या पायात ! किती वर्ष थडग्यात सुखाने होतो .तुम्ही आम्हाला काढला बाहेर आता यांना कुणाला सोडणार नाही आम्ही,हि इमारत एक स्मशान भूमी होईल” एक दुसरं आवाज आला आणि त्या बरोबर खूप सारे आत्मे दिसू लागले सगळ्यांचे डोळे लाल बुंद दिसत होते जस कि डोळ्यातून रक्त वाहत होत निम्मा शरीर निम्मा सांगाडा असा भयानक धड दिसत होते .ते सगळे आता म्याडम आणि अनिल कडे सरकत होते .

                “ थांबा !” करारी स्वरात अनिल ने त्यांना आज्ञा दिली “तुम्ही जर म्याडम न आणि मला संपवला तर तुम्ही कधीच मुक्त होऊ शकणार नाहीत आमच्या बरोबर तुम्ही पण कायम मुक्ती साठी धडपडत राहताल त्याच काय ? म्हातारबा कुठ आहात या आता,” आता त्याच्या आवाहनांना चा परिणाम झाला पुढे सरकणारे सगळे आत्मे एका ठिकाणी स्तब्ध होऊन थांबले . म्हातारबा चा आवाज आला “मी इथ आहे बाळा,कोपर्यामध्ये म्हातारबा शेजारी काही लोकांना घेऊन बसले होते त्यामध्ये म्याडम चे पती आणि मॉल मध्ये मेलेल्या इतर लोकांची गलीतगात्र झालेली आत्मे होते.

              अनिल आणि म्याडम म्हातारबा च्या दिशेने चालू लागले तोवर सगळे आत्मे तिथ जमा झाले होते . “आता काय कराव लागल म्हातारबा ,बिल्डर ने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही त्यांना दिली ,बाकीचे लोक पण बरीच हकनाक मेली आता थांबल पाहिजे” अनिल ने म्हातारबा न उदेशून सगळ्यांना आवाहन केले . “बाळ ,त्यांची हक्काची जागा गेली त्यावर हा भला मोठा मॉल उभारला मॉल च्या मागच्या या हिश्यात स्मशानभूमीची काही जागा बळकावली गेली माणूस इतका स्वार्थी झाला कि त्याला जागेच्या हव्यासात जंगल कमी पडू लागली आता तर स्मशानभूमी पण कमी पडली” म्ह्तार्बा म्हणल्यावर अनिल म्हणाला “म्हातारबा ! शेवटी आत्मे पण माणसाचेच कि तुम्हला तरी कुठ जागेच मोह सुटतोय आता मेल्यावर काय करणार हि स्मशान भूमी ची जागा घेऊन ?” “तसं नाहीय बाळ,किती जरी नाही म्हणला तरी आमचा जीव आपल्या परिवारात अडकलेला असतो हे लोक इथ चीर निद्र घेत असताना त्यांना वर्षातून एकदा तरी परिवारातील लोक स्मृती दिनी भेत्याला येत होती आता थडगीच काढून टाकल्यावर लोक यांना कुठे येऊन भेटणार ? यांना चीर निद्रेतून उठवून त्यांच्या शरीराच्या अवशेशाचे हाल केले गेले .त्या तिथे कोपर्यात सगळी हाडे एकत्र करून पुरून टाकलीत त्यांचा सन्मान परत मिळालं पाहिजे अनिल ! ज्यांचे ज्यांचे थडगे गेले त्या आत्म्याची इथे स्मृतीआणि सन्मान टिकला तर हे सगळं व्यास्थित होईल ”म्हातारबा बोलत होते .

             इतका वेळ सगळं विस्फारलेल्या डोळ्याने बघत आणि ऐकत अनिल चा हात पकडून उभा असलेल्या म्याडम कडे बघत एक दीर्घ श्वास घेऊन अनिल बोलू लागला “ माझ्या कडे एक उपाय आहे ,माहित असलेल्या आणि अनामिक सगळ्या थाद्ग्यांच्या नावाने इथे एक झाड असे इथे सगळी झाडे लावली आणि माहित असलेल्या सगळ्या लोकांची नावाचा एक छोटा बोर्ड लावला आणि प्रत्येक झाडच्या बुडामध्ये ती हाडे विधी पूर्वक पुरली तर चालल का ?” म्याडम ने पण भीत भीत त्याच्या सुरात सूर मिसळला , “मला तुझ्या कडून अशाच उपायाची अपेक्षा होती बाळा जा कामाला लाग! आता सगळ्या आत्मे शांत दिसत होते आणि भेसूर चेहरे जाऊन प्रसन्ना होत होत एक एक आत्मे विरून गेले .किती वेळ गेला कळाल नाही पण आता पहाट झाली होती अनिल आणि madam आता मॉल च्या बाहेर आले तोवर तिथ बरीच मंडळी जमा झाली होती म्याडम चा थकलेला पण समाधानी चेहरा बघून सगळ्यांना नवल वाटत होते .

          दुसर्या दिवशी पासून अनिल च्या नेतृत्वाखाली ठरल्या प्रमाणे सगळं सुरु झाला .यथावकाश मॉल च्या मागे बरीच झाडे लाऊन तिथ आधी एक गार्डन आकार घेऊ लागला .प्रत्येक झाडाला एक व्यक्ती चे नाव दिले गेले.लवकरच गार्डन बहरून आले .आता बांधकाम हि जोरात सुरु होऊन कुठल्या हि अडचणी शिवाय संपले . मॉल माणसांनी गजबजलेला असतो तिथल्या दुकानदारांचा व्यवसाय हि वाढला आहे . अनिल सिक्यरिटी इन्चार्ज म्हणून काम करत आहे .

        मॉल च्या मागे असलेल्या गार्डन च्या तिथे या एका मोठ्या पाटीवर एक छोटासा कृतज्ञता संदेश लिहिला गेला “ सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तीच्या सहकार्याने आणि बलिदानाने उपकृत असलेली इमारत –मुक्ती मॉल !!”(समाप्त )

Comments

Popular posts from this blog

आठरे-पाटील

मला भावलेली माणसे : ****आठरे-पाटील( नाना) *** २००५ सालच्या दरम्यानची गोष्टआहे.मी पुण्यातून दुध डेअरी ची रिपेअरिंग ची काम करत असताना छोटी मोठी प्रोजेक्ट घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि मला नगर जिल्ह्यातलं एक गावामध्ये एक एजन्सी कडून जुनी मशीन्स १नवीन दुध डेअरी मध्ये बसवण्याच काम मिळाल होतं.मला सांगण्यात आल होतं कि तिथ जाऊन "आठरे –पाटील (नाना)" ना भेटा. ठरल्याप्रमाणे मी त्या अडनिड गावी (आता न ाव आठवत नाही गावाचं!) गेलो.आतापर्यंत ३ वर्ष झाले होते मी व्यवसाय सुरु करून आणि महाराष्ट्रातील बऱ्याच दुध डेअरी ना काम निमित्ताने जाण्याचा योग आला होता.त्या मुळे डेअरी चा चेअरमन कसा असतो हे चांगलाच माहित झालं होता. कुठल्या ना कुठल्या पक्षाची पार्श्वभूमी असलेल्या व पांढरे खादीचे कपडे,ती नवीन घेतलेली स्कर्पिओ किवा तत्सम गाडी, आणि बाकीचा लवाजमा, ऑफिस च्या बाहेर ताटकळत बसलेले कुठल्या ना कुठल्या अपेक्षेने बसलेले लोक हे मी आत्ता पर्यंत पाहिलेले वास्तव होते.( अर्थात काही सन्माननीय अपवाद होते पण परिस्थिती साधारण सारखीच होती सगळी कडे) तोच दृष्टीकोन घेऊन मी ती डेअरी शोधत पोहचलो. अर्धवट बांधकाम चालू ...

A man with only hand

A man with only hand  आज रात्री माझ्या वर्कशॉप वर night शिफ्ट चालू असल्यामुळे मी पण थांबून माझा काही काम करत बसलो. laptop वर संदीप माहेश्वरींच्या स्पीच ची एक क्लीप लाऊन ठेवली होती, ती ऐकाताना त्यातील एक कथा फार आवडली म्हणून ती शेअर करतो आ हे. हि कथा आहे क्यारली नावाच्या हंगेरियन सैन्यामधल्या एक पिस्टल शुटर ची. त्याने पिस्टल शुटींग मध्ये मोठ नाव केलेलंआणि राष्ट्रीय स्तरावरच्या बऱ्याच स्पर्धा जिंकल्या होत्या. १९३८च्या एका ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्याच्या उजव्या हातामध्ये ह्यांडग्रेनेड चा स्फोट होऊन तो हात कायमचा वापरण्यास अयोग्य झाला, ज्या हाताने तो पिस्तुल शुटींग मध्ये बक्षीस मिळवायचा तो हातच निकामी झाल्यावर एखाद्याने खरा तर त्या क्षेत्रातल करिअर संपवल असत .लोकांना हि असच वाटलंपण त्याने काय नाही त्या पेक्षा काय आहे या कडे लक्ष दिलं आणि दवाखान्यातून बाहेर पडल्यावर त्याने डाव्या हाताने पिस्तुल शुटींग ची प्रक्टिस सुरु केली . १ वर्षाच्या प्रचंड प्रक्टिस नंतर तो १९३९च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने त्याच्या डाव्या हाताने प्रथम पारितोषिक पटकावले, आणि लोकांना तोंडात बोट घालायला लावले, त्य...

फुगा

             “साहेब, ह्यो फुगा कितीला मिळतो हो हित?” त्याने न राहून आज प्रश्न विचारलाच ! साहेब गाडी काढत म्हणाले “अहो याचा चार्ज लावत नाहीत गिफ्ट असतो !” तसाहेबाच्या मुलीने विचारल “का हो काका तुम्हाला घ्याचायचं का?   कसनुस हसत त्याने नाही म्हणून नेहमी सारखा साहेबाना गाडी रिवर्स घ्यायला मदत केली साहेब निघाले विचार करत परत   थाबुन त्याला विचारलं “duty किती ला संपते तुमची?” त्याने सांगितला ”१० वाजता ” साहेब “बर”एवढाच म्हणाले आणि निघून गेले . आज रविवार असल्यामुळं गर्दी ची वेळ त्या मुळ तो परत   येणारे लोक आपल्या गाड्या निट पार्क करत आहेत का हे बघत असताना सहा महिन्यातला आयुष्याचा पटल त्याच्यासमोर तरळला .                               एक महिना होत आला होता त्याला इथ duty ला लागून !! गावाकडे दुष्काळामुळे शेतीत काय करता येत न्हवत आणि शिक्षण १२ वी झाली होती काही तरी जगायला काम केला पाहिजे   म्हणूनं मग तो पुण्यात आला .गावातलाच एक माणूस इथल्या सिकुरीटी कंपनीत...